‘भारत मोबाईल अ‍ॅप्सचा सर्वात मोठा यूजर, स्वदेशी अ‍ॅप स्टोअर आणण्याची तयारी’ – रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : केंद्र सरकार आपले स्वत:चे मोबाईल अ‍ॅप स्टोअर विकसित आणि मजबूत करण्यासाठी इच्छूक आहे. संसदेत सरकारने गुरुवारी ही माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा वापर करण्यात भारत जगात टॉपवर आहे.

मोबाईल अ‍ॅप तयार करण्यासाठी प्रोत्साहन
राज्यसभेत प्रसाद यांनी म्हटले की, डिजिटल इंडिया कार्यक्रमासह सरकार भारतीय इनोव्हेटर्सला मोबाईल अ‍ॅप तयार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. येत्या काळात या क्षेत्रात भारत अंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मोठे आव्हान सादर करेल. सरकारने मोबाईल सेवा अ‍ॅप स्टोअरला फ्री अ‍ॅप ठेवण्याची परवानगी दिली आहे. आमच्या मोबाईल सेवा अ‍ॅप सेवेत, सर्वकाही आहे आणि एकुण 8.65 कोटी लोकांनी हे डाऊनलोड केले. ही योग्य दिशेने होत असलेली सुधारणा आहे.

त्यांनी म्हटले, आम्ही भारतीयांसाठी मेक इन इंडिया म्हणजे भारतात तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपला प्रोत्साहन देत आहोत. आम्ही आत्मनिर्भर भारत मोबाईल अ‍ॅप इनोव्हेशन स्पर्धा सुरु केली ज्यामध्ये 6940 अ‍ॅप डेव्हलपर पुढे आले. यापैकी आम्ही नऊ कॅटगरीत 25 ची निवड केली आणि त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात आला.

सायबर सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण
सरकारकडून एखादे ’मॅसेजिंग अँड कॉलिंग अ‍ॅप’ सुरू करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रसाद म्हणाले, सायबर सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अशा अ‍ॅप डेव्हलपरला कधीही प्रोत्साहन दिले जाणार नाही ज्यांची अ‍ॅप जोखीम उत्पन्न करू शकतात.

त्यांनी हे सुद्धा सांगितले की, एक मोबाईल सेवा अ‍ॅप अगोदरपासूनच आहे आणि राज्य सरकारांचे मॅसेजिंग सेंटर सुद्धा आहेत. परंतु आम्हाला वाटते की, सरकारच्या बाहेरून मोठ्या संख्येने इनोव्हेशन यावे. सायबर सुरक्षा अत्यंत महत्वाची असून ज्यांचे प्रॉडक्ट शंकास्पद असेल ते आव्हान असेल. सायबर सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही काही अ‍ॅप रोखले आहेत.

त्यांनी सांगितले की, इंडिया अ‍ॅप मार्केट स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट 2021 नुसार, अँड्रॉईडवरील सध्याच्या अ‍ॅपपैकी पाच टक्के असे अ‍ॅप आहेत जे भारतीय डेव्हलपर्सने तयार केले आहेत. गरज पाहून मोबाईल सेवा अ‍ॅप स्टोअर सुरू करण्यात आले, ज्यावर सरकारी अ‍ॅप आहेत आणि ते खासगी अ‍ॅप सुद्धा ठेवू शकते. मोबाईल सेवा अ‍ॅप स्टोअर भारताचे पहिले स्वदेशात विकसित अ‍ॅप स्टोअर आहे ज्यामध्ये विविध डोमेन आणि जनसेवा कॅटगरीचे 965 पेक्षा जास्त अ‍ॅप आहेत. हे अ‍ॅप फ्री डाऊनलोड केले जाऊ शकतात.