संभाजीराजेंचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे(Sambhaji Raje ) छत्रपती यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje ) यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. संभाजीराजे यांच्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र, राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशा वेळी खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

खासदार संभाजीराजे हे सध्या तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्यामुळे त्यांना किल्ल्यावर जाता आले नाही. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. तसेच मला हेच लक्षात येत नाही की, माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कर्यकर्त्यावर हेरगिरी करुन काय साध्य होणार, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

 

Pune : कोरोना नियमांचे उल्लंघन ! भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर FIR

Pune : ‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय ? व्यवहार टक्केवारीसाठी अडलायं की अंतर्गत कलहामुळे – माजी आमदार मोहन जोशी

Pune : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ3

Coronavirus Vaccine : वेळेवर ‘व्हॅक्सीन’ टोचून घ्या अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसे