सरकारकडून ‘DL’ नुतणीकरणासाठी ‘ही’ मोठी सुविधा ; आता ‘RTO’ कार्यालयाचे ‘हेलपाटे’ घालण्याची गरज नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुमच्या जवळ कोणत्यातरी दुसर्‍या शहरातील ड्रायव्हिंग लायसन (वाहन चालविण्याचा परवाना) असेल आणि तुम्ही जर दुसर्‍या शहरात रहावयास असाल तर आता ड्रायव्हिंग लायसनच्या नुतीनकरणासाठी तुम्हाला संबंधित शहरात अथवा राज्यात जाण्याची अजिबात गरज नाही. आता हे काम तुम्ही ज्या शहरात रहावयास आहेत तेथेच होवु शकते. म्हणजेच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनच्या नुतणीकरसाठी संबंधित शहरात जाण्याची अजिबात गरज नाही. शासनाने ‘डीएल सारथी’ नावाच्या नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती केली असून त्यामध्ये सर्व ड्रायव्हिंग लायसन धारकांचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरव्दारे कोणत्याही राज्यातील आरटीओ कार्यालयातील अधिकारी लायसनच्या रेकॉर्डची तपासणी करू शकतो.

देशाची राजधानी दिल्‍ली आणि नोएडा येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लायसनचे नुतणीकरण अथवा पत्‍ता बदलण्यासाठी संबंधित शहरात जाण्याची गरज नाही. दिल्‍लीच्या परिवहन विभागाने या संबंधित आदेश काढला असुन अधिकार्‍यांना ना-हरकत प्रमाणपत्र मागु नका असे सांगितले आहे. मात्र, संबंधिताच्या लायसनवर चीप असणे आवश्यक आहे. ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन हे कागदावर आहे त्यांना मात्र ना-हरकत प्रमाणपत्राची गरज भासणार आहे कारण त्यांचा डाटा अद्याप सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्यांचे लायसन कागदावर आहे त्यांना लायसन नुतणीकरणासाठी तसेच पत्‍ता बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. नोएडामध्ये देखील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नोएडा तसेच ग्रेटर नोएडा परिसरात राहणारे नागरिक परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावुन तेथे अर्ज करू शकतात. लायसन नुतणीकरणासाठी 400 रूपये फीस लागते.

महाराष्ट्रातही सुविधा लागू !

डीएल सारथी हे सॉफ्टवेअर सर्व आरटीओ कार्यालयात उपलब्ध आहे. त्यामुळे परप्रांतातुन किंवा इतर शहरातुन दुसरीकडे स्थायिक झालेल्या वाहन चालकांना आता लायसन ज्या शहरातून काढले तेथील आरटीओ कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज नाही. वाहन चालक सध्या जिथे रहावयास आहे तेथील आरटीओ कार्यालयात देखील त्यांच्या लायसनचे नुतणीकरण तसेच त्यांच्या लायसनवरील पत्‍ता बदलता येतो.

You might also like