सरकारने लॉन्च केले Covid-19 लसीकरण ट्रॅकर, रिअल टाईम अपडेट पाहता येणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी देश सध्या सज्ज झाला आहे. देशात शनिवारपासून (दि. 16) जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या संबंधित एका नवीन ट्रॅकरचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. या ट्रॅकरला MyGov या वेबसाईटवर इंटीग्रेटेड केले आहे. त्यामुळे आता देशातील किती लोकांना कोरोना दिली तसेच लसीकरणा संबंधित सर्व प्रकारच्या माहितीचे रियल टाइम अपडेट्स मिळणार आहेत.

MyGov या वेबसाईटवरुन रोजच्या रोज कोरोनाच्या लसीकरणासंबंधी टेस्टिंग स्टेट्स आणि अ‍ॅक्टिव्ह केसेसचे रियल टाईम स्टेट्स दिले जाणार आहे. कोरोनाविरोधात कशी पावले उचलली जात आहेत, याची माहिती राज्यवार आकडेवारीही देण्यात येत आहे.आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचे वेऴापत्रक जाहीर केले आहे. मोठ्या राज्यांत आठवड्यातील चार दिवस तर लोकसंख्या कमी असलेल्या लहान राज्यांत दोन दिवस लसीकरणासाठी निश्चित केले आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने लसीकरणासाठी नोंदणी करणे तसेच लोकांपर्यंत लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती पोहचवण्यासाठी ‘को-विन’ नावाचे एक अ‍ॅप तयार केले आहे. कोरोनाच्या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी या अ‍ॅपवर नोंदणी करणे आणि महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.पंजाब आणि हरियाणा या राज्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी को-विन अ‍ॅपच्या वापराच्या नियमांना सुलभ केले आहे. या दोन राज्यातील आरोग्य विभागाने लसीकरणासाठी आवश्यक नोंदणीकरणाशिवाय हे अभियान पुढे नेण्यास मंजूरी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,823 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 162 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,05,95,660 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,52,718 लोकांना जीव गमवावा लागला आहे.