बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी; मोदी सरकार उचलणार ‘हे’ महत्वाचं पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिटकॉईनवर बंदी घालणारे विधेयक तयार केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही (RBI) रुपयाची डिलिटल करन्सी आणण्याची योजनेवर काम सुरु केले आहे. त्यानुसार तयारीही सुरु आहे.

डिजिटल करन्सी म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या रुपात संपूर्ण जगभरात बिटकॉईनचे जाळे पसरले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून देशभरात बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर बंदीपासून संबंधित एक विधेयक संसदेच्या पटलावर सूचीबद्ध करण्यात आले आहे. म्हणजे संसदेच्या याच सत्रात हे विधेयक पारित करून सरकार कायमस्वरूपी बिटकॉईनवर बंदी घालणार आहे. तसेच दुसरीकडे सरकार डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून (शुक्रवार) सुरु झाले आहे. या सत्रात बिटकॉईन, ईथर, रिपल आणि इतर बाबींवर बंदी आणण्यासाठी विधेयकाची मांडणी करण्यात आली. विधेयकात जास्तीत जास्त डिजिटल मुद्रावर निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. त्यासाठी सरकार स्वत: क्रिप्टोकरन्सी आणण्यासाठी कायदेशीर मार्ग तयार करत आहे.

यापूर्वी 25 जानेवारीला रिझर्व्ह बँकेच्या (RBI) एका बुकलेटमध्ये रुपयाचे डिजिटल स्वरूप आणण्याचा विचार केला होता. त्यानंतर आरबीआय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, की रुपया डिजिटल एडिशनला किती फायदा आहे किंवा किती उपयोगी आहे.