मोबाईल चोरीला गेलाय, काळजी करू नका ; परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारची ‘नवीन’ योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर शोधायचा कसा असा प्रश्न सतावतो. मोबाईल हरवण्याच्या किंवा चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. मोबाईल फोन शोधण्याची चाचणी सर्वात प्रथम महाराष्ट्रात घेण्यात आली आहे. या चाचणीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आता देशभरात ही सेवा लाँच करण्यात येणार आहे.

हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी केंद्रीय दुरसंचार विभागानं देशातील सर्व मोबाईल फोन्सचा एक डेटाबेस तयार केला आहे. या डेटाबेसला ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ असं नाव देण्यात आलं आहे. या रजिस्टरमध्ये देशातील सर्व मोबाईलच्या IMEI क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे. फोनची चोरी झाल्यास पोलिसांना कळवल्यानंतर तात्काळ या डेटाबेसमधून तुमचा मोबाईल IMEI क्रमांकाच्या आधारे फोन ब्लॉक करण्यात येईल. तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोधही घेण्यात येईल.

स्मार्टफोन्स आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा झाले आहेत. मोबाईल हरवण्याच्या नुकसानीपेक्षा आपला डेटा दुसऱ्यांच्या हाती पडणे हे जास्त धोक्याचं असतं.

आरोग्यविषयक वृत्त
सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी 

पावसाळ्यात “ऍलर्जीचा” सामना करताना

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे 

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम 

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त 

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय 

Loading...
You might also like