मोदी सरकारची योजना ! खासगी कारचा आता टॅक्सी सारखा वापर करू शकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने रस्त्यावर वाढणाऱ्या गाड्यांचा विचार करता नवी ‘कार पूलिंग मार्गदर्शक तत्वे’ तयार करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार वैयक्तिक कार मालक आपल्या कारचा वापर प्रवासी वाहन म्हणून देखील करु शकेल. असे असले तरी या वैयक्तिक वाहनातून दिवसाला फक्त चारदा सेवा देता येईल. म्हणजेच आता खासगी वाहन चालक देखील भाडे घेऊ शकतील.

अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार बुकिंग
यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कार पूलिंग करता येणार आहे. त्यासाठी कार मालकाला आपली आणि कारची माहिती नोंदवावी लागेल. परंतू यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तसेच ट्रिप स्टार्ट करण्याआधी कार मालकाला आपल्या ‘ट्रिप डिटेल डिक्लेअर’ करावी लागेल. कार पुलिंग संबंधित क्विक राइड सारखे अ‍ॅप उपलब्ध आहे.

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की जर कार मालक राइड शेअरिंगची सेवा देऊ इच्छित असेल तर त्यांना आणि प्रवाशांना केवायसीचे पालन करावे.

ओला उबरला वेगळा प्लॅटफार्म तयार करणार
देशात आधीपासूनच कार पूलिंगचे अ‍ॅप आहेत. जसे की Quick Ride आणि Blablacar. या अ‍ॅपला देखील नव्या मार्गदर्शक तत्वानुसार अपडेट व्हावे लागणार आहे. तसेच ओला, उबरसाठी वेगळा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे.

 

You might also like