सामान्यांना सतावणाऱ्या प्रश्नांवर सरकार बोलत नाही : सयाजी शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आजच्या सत्ताधाऱ्यांना सामान्यांचा विसर पडला आहे. सामान्य माणसाला सतावणाऱ्या प्रश्नांवर सरकार बोलत नाही. मात्र आपण चळवळीच्या माध्यमातून हे प्रश्न विचारत राहणे गरजेचे आहे. सामान्यांच्या प्रश्नांसाठी, न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. सयाजी शिंदे हे दया पवार स्मृति पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पद्मश्री दया पवार स्मृति प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या माध्यमातून आयोजित दया पवार स्मृति पुरस्कार सोहळ्यामध्ये सयाजी शिंदे, लेखक आनंद विंगकर आणि राहुल कोसंबी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00713ff5-bd52-11e8-a99b-2ba9ede2859c’]

या सोहळ्यात दया पवार यांच्या आठवणी जागवताना सयाजी शिंदे म्हणाले, आपले सेन्सॉर जात पंचायतीसारखे आहे. आपल्याकडे श्लील-अश्लील संकल्पनांचे खूप घोळ आहेत. मी झुलवा नाटक करत होतो. त्यामध्ये खूप शिव्या आहेत. त्यावेळी मी दया पवारांना भेटायला गेलो होतो. काही शब्द उच्चारण्यावर बंदी आली होती, ते शब्द वगळायला सेन्सॉरने सांगितले होते. तेव्हा दया पवार यांनी ते शब्द आले नाहीत तर त्या भूमिकेला मजा येणार नाही, असे सांगत हे शब्द उच्चारायला पाठिंबा दिला होता, अशीही आठवण सयाजी शिंदे यांनी जागवली.

साहित्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, विद्रोही साहित्यामुळे विचारांना वेगळे वळण लागले. महाविद्यालयात असताना पहिल्यांदा दया पवारांच्या कविता ऐकल्या होत्या. या कवितांच्या प्रेमात पडलो आणि त्या लिहून काढायला लागलो. मित्रांना ऐकवू लागलो. या कवितांमुळे मला अभिनेता म्हणून घडण्यासाठीही फायदा झाला. पद्मश्री दया पवार यांच्या नावे मिळालेला हा पुरस्कार पद्मश्रीपेक्षाही मोठा वाटतो. तर नजूबाई गावित यांनी आपले मनोगत मांडताना विविध विषयांवर भाष्य केले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’075c7dcf-bd52-11e8-a9f3-176d78d629ad’]

बलुतंच्या चाळिशीच्या निमित्ताने झालेल्या परिसंवादामध्ये दिनकर गांगल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. रावसाहेब कसबे, सुशीलकुमार शिंदे आणि रामदास फुटाणे सहभागी झाले होते. या परिसंवादामध्ये बलुतंपासून आतापर्यंतच्या परिस्थितीचा सामाजिक आणि राजकीय वेध घेण्यात आला.

आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकारला सत्तेची संधी : अण्णा हजारे 

पेट्रोल पुन्हा १५ पैशांनी महागले, पुण्यात दराची नव्वदीकडे वाटचाल!