सावधान ! आजपासून ‘विना परवाना’ वाहन चालवल्यास 5000 रुपये ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने संशोधित मोटर वाहन कायदा 2019 चे 63 उपनियम लागू करण्यासंबंधित नोटिफिकेशन जारी करण्यात आले. हे सर्व 63 उपनियम वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या दंडासंबंधित आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे उपनियम आजपासून (1 सप्टेंबर 2019) पासून लागू होतील. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला भरमसाठ दंड भरावा लागू शकतो.

इतर उपनियमांसाठी तयार केला जात आहे ड्राफ्ट –
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंबंधित माहिती दिली आहे की, हे असे उपनियम आहेत, जे नाही करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये बदल करण्याची गरज भासणार नाही. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, संशोधित मोटर वाहन कायदा 2019 च्या इतर उपनियमांना लागू करण्यासाठी ड्राफ्ट तयार करण्यात येत आहे. ड्राफ्ट तयार झाल्यावर, इतर उपनियमांना लागू करण्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येईल.

विना परवाना चालकावर 5000 रुपयांचा दंड –
मंत्रालयाने सांगितले की, नवीन उपनियम दंड वाहन परवाना, नोंदणी, नॅशनल ट्रांसपोर्ट पॉलिसी इत्यादीशी संबंधित आहे. नव्या नियमांनुसार जर कोणी विना परवाना बेकायदेशीर वाहन चालवताना पकडले गेले तर त्यांच्यावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. सध्या या दंडाची रक्कम 1 हजार रुपये आहे. विना परवाना वाहन चालवल्यास दंड वाढवून 500 रुपयांवरुन 5 हजार रुपये करण्यात आला आहे.

दारु पिऊन वाहन चालवणे पडणार महागात –
दारु पिऊन वाहन चालवताना पहिल्यांदा पकडल्यास 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड आणि दुसऱ्यांना पकडल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नव्या उपनियमांनुसार राज्य सरकारला ओवरलोड वाहने पकडण्यासाठी एका व्यक्तीची किंवा एजेंसीची म्हणजेच एनफोर्स एजेंसीची नियुक्ती करण्याचा आधिकार देण्यात आला आहे. मोटर वाहन कायदा 2019 महिन्याच्या सुरुवातीलाच संसदेत समंत करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –