Coronavirus Impact : शेतकरी अन् महिलांसह 80 कोटी लोकांना मिळणार ‘या’ गोष्टी ‘एकदम’ फ्री, मोदी सरकारनं केल्या 10 घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केल्या 'या' 10 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – कोरना व्हायरसचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा म्हणजेच 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केला आहे.  कोरोना रुग्णामुळे उपासमारीची वेळ आलेल्या गरीब जनतेसाठी अर्थमंत्री सीतारमण यांनी अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

निर्मला सीतारमन यांच्या 10 मोठ्या घोषणा
1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज. शहरी आणि ग्रामीण भागातील स्थलांतरित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार
2. पंतप्रधान किसान योजना, किसान सन्मान निधीचा फायदा 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांना मिळणार. 2 हजार रुपये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खात्यावर जमा होतील.
3. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत येणाऱ्या 80 कोटी लाभधारकांना पुढील तीन महिने अतिरिक्त गहू, तांदूळ आणि डाळ मोफत
4. कोरोनाशी लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांच्यासाठी 50 लाख रुपयाचा विमा
5. वृद्ध, दिव्यांग आणि विधवांना तीन महिने 1 हजार रुपये अतिरिक्त मिळतील. दोन टप्प्यात ही रक्कम मिळेल. 3 कोटी लाभधारकांना याचा फायदा
6. जन-धन खाते असणाऱ्या 20.5 कोटी महिलांना पुढच्या तीन महिन्यासाठी 500 रुपये अर्थसहाय्य
7. मनरेगा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन हजार रुपये, 5 कोटी कुटुंबांना फायदा होणार
8. उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना पुढच्या तीन महिन्यांसाठी घरगुती गॅस मोफत
9. 15 हजार रुपयापेक्षा कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात सरकार तीन महिन्यांसाठी 24 टक्के योगदान देणार
10. बांधकाम कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने कर्मचारी कल्याण निधीतून मदत करावी. या अंतर्गत 3.5 कोटी कर्मचाऱ्यांची नोंदणी