भ्रष्टाचाराच्या विरोधात मोदी सरकारचं आणखी एक मोठं पाऊल ! पुन्हा 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली ‘रिटायरमेंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात देखील आपल्या अधिकाऱ्यांचा कामावरून कमी करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. सरकारने आज आयकर विभागातील 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबरदस्ती रिटायर्ड केले. याआधी देखील आयकर विभागातील 12 अधिकाऱ्यांना अशाचप्रकारे कामावरून कमी करण्यात आले होते.

जून महिन्यात नवनिर्वाचीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड एडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स च्या नियम क्रमांक 56 च्या अंतर्गत त्यांनी या अधिकाऱ्यांना निवृत्त केले आहे. निवृत्त करण्यात आलेल्या या सर्व मोठ्या आधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार तसेच अवैधरित्या संपत्ती गोळा करण्याचे आरोप होते.

का उचलत आहे सरकार हे पाऊल

कलम 56 अंतर्गत सरकार अशाप्रकारे कामचुकार तसेच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी बसवू शकते. या नियमानुसार 30 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या 50 वर्षांपुढील अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर युवा अधिकाऱ्यांना संधी देऊन देशाच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्याचबरोबर प्रशासनांत देखील यामुळे मोठे बदल होणार आहेत.

या नियमांतर्गत केले निवृत्त

1) कलम 56 अंतर्गत सरकार अशाप्रकारे कामचुकार तसेच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी बसवू शकते. या नियमानुसार 30 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या 50 वर्षांपुढील अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आले आहे.

2) या अधिकाऱ्यांना तीन महिन्याचे आगाऊ वेतन आणि नोटीस देऊन निवृत्त करण्यात येते. त्याचबरोबर अशा अधिकाऱ्यांच्या कामांची दर तीन महिन्यांनी समीक्षा करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप असल्यास त्यांना जबरदस्ती निवृत्त देखील केले जाऊ शकते.

3) केंद्र सरकारकडे हा पर्याय पहिल्यापासून आहे, मात्र आजपर्यंत याचा वापर कधीही करण्यात आला नव्हता. मात्र यावेळी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून 2014, 2015 आणि 2017 मध्ये याचा मोठा वापर करून अनेकांना घरी बसविण्यात आले होते.

4) याआधी केवळ अ आणि ब वर्गातीलच अधिकारी फक्त या नियमांत होते. मात्र आता क वर्गातील अधिकारी देखील यामध्ये आल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या