विमानासारख्या सुविधा असणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला मिळालं आणखी एक मोठं यश ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई कारखान्यात बनवलेल्या विमानाप्रमाणे सुविधा पुरविणाऱ्या पहिल्या ‘सेमी-हाय स्पीड एक्सप्रेस ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला आणखी एक मोठी सफलता मिळाली आहे. इंडियन पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे टपाल तिकिट जारी केले आहे. या टपाल तिकिटाची किंमत ५ रुपये ठेवण्यात आली आहे. भारताची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते बनारस दरम्यान चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी प्रथमच या गाडीला हिरवा झेंडा दाखविला होता. त्याचबरोबर देशातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन दिल्ली ते कटरा दरम्यान धावण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे.

५ रुपये किमतीचे टपाल तिकीट जारी
१) वंदे भारत एक्स्प्रेसच्या डाक तिकिटावर हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस लिहिलेले आहे.

२) ही भारतातील पहिली पूर्णपणे सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. मुद्रांकात तळाशी इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) लिहिलेले आहे.

३) चेन्नई रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेस तयार करण्यात आली होती.

४) वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आठवड्यातून ५ दिवस दिल्ली ते वैष्णोदेवी दरम्यान धावणार आहे.

५) वंदे भारत एक्स्प्रेसला १६ डब्बे आहेत. त्यामध्ये बसण्यासाठी ११२८ जागा आहेत. यात सामान्य १४ डब्बे आहेत ज्यामध्ये १३६ सीट आहेत उरलेले २ आरक्षित डब्बे आहेत त्यामध्ये१०४ सीट आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –