‘कोरोना’च्या संकट काळात व्यावसायिकांसाठी मोठी बातमी ! GST सदंर्भात सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंम्पोजीशन योजनेंतर्गत सरकारने डीलर्सला दिलासा दिला आहे. यासाठी त्यांनी 2019 – 2020 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा अंतिम मुदत वाढविण्यात आली. यापूर्वी हा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती. ती 31 ऑगस्ट करण्यात आले.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) एका ट्विटमध्ये म्हटले की, वित्त वर्ष 2019-20 चा जीएसटीआर 4 भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर अंतर्गत (जीएसटी) वार्षिक 1.5 टक्क्यांपर्यंतची उलाढाल असलेला कोणताही करदाता कंपोजीशन योजना लागू करू शकतो. या योजनेतील उत्पादक आणि व्यापार्यांना एक टक्का दराने जीएसटी भरावा लागेल. तर नॉन – अल्कोहोलिक रेस्टॉरंट्सला पाच टक्के दराने जीएसटी भरावा लागतो.