मोदी सरकार लवकरच आणणार 1 रुपयाची ‘नोट’, जाणून घ्या ‘डिझाईन’ आणि ‘रंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच आपल्या खिशात १ रुपयांच्या नोटा येणार आहेत. या नोटांचे प्रिंटिंग भारतीय रिझर्व्ह बँक नाही तर अर्थ मंत्रालय करणार आहे. सरकारने एका गॅझेट नोटिफिकेशनमध्ये १ रुपयांचे नवीन चलन जारी करण्याची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया या नव्या १ रुपयांच्या नोटांच्या काही खास गोष्टी.

१. एक रुपयाच्या नवीन नोटेवर ‘भारत सरकार’ असे लिहिलेले असणार आहे. हे ‘Government of India’ च्या ठीक वरील बाजूस लिहिलेले असणार आहे.

२. या नोटवर वित्त सचिव अतनू चक्रवर्ती यांची स्वाक्षरी असेल. त्यांची ही स्वाक्षरी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असेल.

३. या नोटवर २०२० सीरिजच्या एक रुपयाच्या नाण्याच्या प्रतिकृती देखील छापल्या जातील, त्यावर ‘सत्यमेव जयते’ देखील लिहिले असेल. तसेच नंबरिंग पॅनेलवर ‘L’ लिहिले जाईल.

४. नोट च्या उजव्या बाजूला खालील काळ्या पट्टीवर एक नंबरिंग पॅनेल असेल.

५. या नोटवरील प्रथम तीन अक्षरे एका आकारात लिहिली जातील.

६. नोटच्या दुसर्‍या बाजूला ‘भारत सरकार’ आणि ‘Government of India’ हे शब्दही लिहिले गेले आहेत. या नोट वर बनविलेले १ रुपयाचे नाणे २०२० लिहिलेले असेल आणि रुपयाचे चिन्ह देखील बनवले जाईल.

७. रुपयाच्या चिन्हाबरोबरच धान्याचे डिझाईनही तयार केले जाईल, ज्यामुळे देशातील शेती दर्शविली जाईल. तसेच या नोटवर ‘Sagar Samrat’ चे देखील चित्र असेल, ज्यामध्ये देशाचे तेल शोध दर्शविले जाईल.

८. या नोटचा रंग मुख्यत: गुलाबी आणि हिरवा असणार आहे. तसेच अन्य काही रंगांचा देखील वापर केला जाणार आहे.

९. एक रुपयाच्या या नोट चा आकार ९.७ x ६.३ सेंटी मीटर असेल.

१०. एका रुपयाच्या नव्या नोटवर मल्टी टोनवर अशोक पिलरचा वॉटरमार्क आहे. डावीकडील बाजूस वरपासून खालच्या भागापर्यंत भारत लिहिले असेल.