PF चे वाद निकाली काढण्यासाठी सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय, पैसे लवकर मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारासाठी पीएफ संबंधित अत्यंत महत्वाचा निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यात अनेक प्रकरण समोर आली आहेत ज्यामुळे लोकांच्या पीएफमधील पैसे अडकून राहिले आहेत. परंतू ही प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी आता केंद्र सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहेत. जेणे करुन कर्मचाऱ्यांचा कंपनीबरोबर असलेल्या पीएफच्या वादांना लवकर निकाली काढता येईल. कायद्याअंतर्गत पीएफ संबंधित वादांची सीमा 2 वर्षात निकाली काढण्याची तरतूद आहे.

हा आहे यामागील उद्देश –
श्रम मंत्रालयाने या संबंधित प्रस्ताव तयार केला आहे, ज्याला पुढील बैठकीत सहमती दर्शवून कायदा तयार केला जाईल. इज ऑफ डूइंग बिजनेसच्या रॅकिंगला वाढण्याच्या उद्देशाने सरकार बदल करण्याच्या तयारीत आहे. यात पीएफच्या प्रकरणाला तात्काळ तापसणीनंतर 2 वर्षात निकाली काढण्यात येईल.

आतापर्यंत या प्रकरणांसाठी कोणतीही सीमा निश्चित करण्यात आली नव्हती. यामुळे पीएफ संबंधित वाद अनेक वर्ष सुरु राहत होते. कॉर्पोरेट प्रतिनिधीनी याला लवकर निकाली काढण्याची शिफारस केली होती. तरतूद आहे की पाच वर्षांपेक्षा जूने वाद निकाली काढण्यासाठी पुन्हा सुरु करण्यात येणार नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like