लॉकडाऊनमुळं ‘या’ क्षेत्राचं सर्वाधिक नुकसान, सरकारनं देखील केलं मान्य

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी म्हटले की, लॉकडाऊनमुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. सोबतच सप्लाय चेन सुद्धा प्रभावित झाली आहे. अशावेळी डिफेन्स सेक्टरवर सुद्धा परिणाम होणे स्वाभाविक आहे. डिफेन्स सेक्टरला अन्य सेक्टरच्या तुलनेत जास्त दबावाचा सामना करावा लागला आहे.

मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विक्रमी घसरण

लॉकडाऊनमध्ये असलेल्या सक्तीमुळे इंडस्ट्रियल व्यवहार ठप्प झाले होते. भारतात एप्रिलमध्ये हे व्यवहार सर्वात खालच्या स्तरावर आले होते. सोमवारी जारी निक्केई आयएचएस मार्केट सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे.

आयएचएस मार्केटचा एप्रिलचा पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स घसरून अवघा 27.4 राहीला आहे. आयएचएस मार्केट प्रत्येक महिन्याला मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरचे आकडे जारी करते. हा सूचकांक 50 च्या वर राहणे, वृद्धी आणि त्यापेक्षा खाली राहणे, घसरण दर्शवतो. तर 50 वर राहणे म्हणजे स्थिरता होय. म्हणजे या क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.

मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आपल्या एका रिपोर्टमध्ये शुक्रवारी हे म्हटले आहे. या आयएचएस एजन्सीने म्हटले की, भारताला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारताचा विकासदर झिरोवर राहू शकतो, परंतु 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने रिकव्हरी होईल. मुडीजने हेदेखील म्हटले की, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यस्थेची जीडीपी ग्रोथ 6.6 टक्केपर्यंत जाऊ शकते. असे झाल्यास भारताला मंदीच्या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल.