111.98 लाख शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये पोहचले 89910 कोटी रूपये, तुम्ही देखील घेवु शकता ‘या’ स्कीमचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार (भारत सरकार) शेतकर्‍यांच्या मदतीसाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, आतापर्यंत १ कोटीहून अधिक शेतकर्‍यांना केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड दिले गेले आहे. त्याअंतर्गत त्यांच्या खात्यात ८९,८१० कोटी रुपये पोचले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डांद्वारे शेतकरी कमी दराने कर्ज घेऊ शकतात.

केसीसीवर कसे कमी असते व्याज ?
केसीसीवर शेतीसाठी घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे व्याज दर तर ९ टक्के आहे. पण त्यात सरकार २ टक्के अनुदान देते. अशा प्रकारे ते ७ टक्क्यांपर्यंत येते, परंतु वेळेवर परताव्यावर ३ टक्के आणखी सूट मिळते. अशा प्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी याचा दर फक्त ४ टक्के असतो.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, “अडीच कोटी शेतक्यांना २ लाख कोटी रुपयांचे सहज आणि सवलतीचे क्रेडिट उपलब्ध करण्यात येईल.” कोणत्याही शेतकऱ्याने सावकारांकडून कर्ज घेऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे कारण त्याचे व्याज दर खूपच जास्त असते आणि शेतकरी या कर्जातून बाहेर पडू शकत नाही. तर सरकारी कर्ज घेतल्यावर वर्षाकाठी केवळ ४ टक्के व्याज आकारले जाते, जे देशातील कोणत्याही कर्जावरील सर्वात कमी दर आहे.

केसीसीचे पावणे आठ कोटी लाभार्थी
या आकडेवारीनुसार, केसीसीचे सुमारे पावणे आठ कोटी लाभार्थी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान-किसान योजनेतील लाभार्थी आणि केसीसी कार्डधारकांच्या संख्येत जितका फरक आहे. आम्हाला सर्वांना पैसे द्यायचे आहेत. २४ फेब्रुवारी रोजी केसीसीला पंतप्रधान किसान योजनेशी जोडून हे कार्ड बनवणे सोपे केले गेले होते.

आता सोपे झाले आहे केसीसी बनवणे
पूर्वी बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कानकूच करत असत. मोदी सरकारने पंतप्रधान-किसान सन्मान निधीला जोडले तर कर्ज घेण्यासाठी कार्ड मिळवणे सोपे झाले. कारण केंद्र सरकारने त्यांचे महसूल नोंदी, बँक खाते आणि आधार कार्ड यापूर्वीच मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने यंदा १५ लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

कोठून मिळेल केसीसी फॉर्म?
सर्व प्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. या वेबसाइटमध्ये फार्मर टॅबच्या उजव्या बाजूला केसीसी फॉर्म डाउनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

याद्वारे किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म प्रिंट केल्यानंतर तो भरावा लागेल.

कसे बनवायचे कार्ड?
शेतकरी हा फॉर्म भरून आपल्या जवळच्या व्यावसायिक बँकेत जमा करू शकतो. कार्ड तयार झाल्यावर बँक शेतकऱ्यास माहिती देईल. मग ते त्याच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

हा फॉर्म नवीन क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी अर्ज करण्याशिवाय विद्यमान कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी आणि बंद क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो.

हा एक पानी फॉर्म भरणे खूप सोपे आहे. यामध्ये शेतकऱ्याने प्रथम ज्या बँकेत अर्ज केला त्या बँकेचे नाव आणि त्या शाखेचे नाव भरणे आवश्यक आहे.