शासकीय वाटपात देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ भेटला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकारने शासकीय बंगल्याचे वाटप केले असून त्यांना मुंबईतील मलबार हिल येथील ‘सागर’ हा बंगला वाटपात मिळाला आहे. त्याबाबतचा आदेश आज (सोमवार) शासनाने काढले आहेत.

निकाल लागल्यानंतर सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यातच राहण्यासाठी 3 महिन्यांची मुदत वाढवून घेतली होती असे वृत्त होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. तेच मुख्यमंत्री आगामी 5 वर्षासाठी राहतील अशी परिस्थिती काही वेळासाठी निर्माण झाली होती. मात्र, त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानं कोसळलं. त्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

वर्षा निवासस्थानावरून दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली होती. आज (सोमवार) महाराष्ट्र शासनाने त्यांना शासकीय बंगल्याचे वापट केले असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील मलबार हिल येथील ‘सागर’ हा बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना परंपरेप्रमाणे ‘वर्षा’ बंगला, छगन भुजबळ यांना ‘रामटेक’, जयंत पाटील यांना ‘सेवासदन’ तर एकनाथ शिंदे यांना ‘रॉयलस्टोन’ बंगल्याचे वाटप शासनाकडून करण्यात आले आहे.

Visit : policenama.com