‘महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही’ : नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. असं सरकार महराष्ट्रासाठी आणि विचारधारेसाठी स्थिर नसेल असंही त्यांनी म्हटलं आहे. महाविकासघाडीवर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणं हे विचारधारेच्या दृष्टीकोनातूनही चांगलं नाही. त्यांच्या विचारधारा वेगळ्या असल्यानं त्यांची आघाडी जास्त दिवस टिकणार नाही. अशा भिन्न विचारांमुळे राज्यातील सरकार हे स्थिर असणार नाही. त्यामुळे त्या पक्षांनी एकत्र येणं हे सरकारच्या आणि विचारधारेच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नाही,” असं ते म्हणाले.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वात लवकरच सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार आहे हे मात्र फायनल झालं आहे. याबाबत नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे. याशिवाय दोन्ही पक्षात दीर्घकाळ युती राहिली आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच शिवसेनेनं आघाडी सोबत जायला नको होतं असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

Visit : Policenama.com