Coronavirus : जयपुरमधील ‘रामगंज’ असं बनलं ‘कोरोना’गंज, 48 तासात समोर आले 100 प्रकरणं

राजस्थान : वृत्तसंस्था – जयपूरचे रामगंज राजस्थान सरकारसाठी डोकेदुखी ठरत असून राज्य सरकारने संपूर्ण भागाचे छावणीमध्ये रूपांतर केले आहे, पण अद्यापही कोरोनाची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. तसेच गेल्या ४८ तासात एकट्या रामगंजमध्ये १०० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सरकार दावा करत आहे की २ दिवसातच कमी प्रकरणं समोर येण्यास सुरवात होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा जयपूरच्या महाराजा सवाई जयसिंहने जयपूरला स्थापित केले होते तेव्हा रामगंज देखील बांधले होते. रामगंजमध्ये जयपूर सैन्यातील सैनिक आणि कारागीर राहत होते. येथे ९० टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे. येथे अतिशय दाट लोकवस्ती आहे आणि उंच इमारतींदरम्यान अरुंद रस्ते आहेत. या रस्त्यांमध्ये कोरोना असा पसरला की त्याला कसे सामोरे जावे हेच कळत नाही.

माहितीनुसार, फक्त २ जणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याने रामगंज आणि आसपासच्या भागात ६ किमीच्या परिघात ६५० हून अधिक प्रकरणं समोर आली आहेत, त्यात १ किमीच्या परिघामध्ये ४५० लोक पॉजिटीव्ह आहेत. सुरुवातीला मस्कटमधील एक व्यक्ती आणि त्याच्या मित्राकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शंभर-पन्नासहून अधिक कोरोना रूग्णांची साखळी बनली.

यानंतर समस्या अशी होती की या अरुंद गल्ल्यांमध्ये घरात राहणाऱ्या २०-२५ लोकांना एकत्र करून तपासासाठी तयार केले. एनआरसी आणि सीएएच्या भीतीमुळे रामगंजमधील लोकांनी स्क्रिनिंग करण्यास नकार दिला, यामुळे कोरोनाचा प्रसार झाला. आता सरकार म्हणत आहे की आम्ही शक्य तितक्या चाचणी करण्यासाठी लोकांना घराबाहेर काढत आहोत.

रामगंजच्या ज्या गल्ल्यांमध्ये सर्वात जास्त कोरोना पसरला आहे त्यात फुट्टा खुर्रा, पतंगाची गल्ली, जगन्नाथ रस्ता, कोळसा गल्ली, हुजुरी तोफखाना, हरी नगर, निवाई महंताचा रस्ता, गुलजार मशिद, रहमानिया मशिद, छोटी मशिद घाट गेट इत्यादींचा आहे. या सर्व गल्ल्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि १ किलोमीटरच्या परिघात आहेत.

राजस्थान सरकारने दोन हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी कारवाई करण्यासाठी तैनात केले असून ५०० हून अधिक डॉक्टर आणि नर्सेसची टीम २४ तास कार्यरत आहे. तपासात सहकार्य न केल्याने, लॉकडाऊन तोडल्याने आणि अफवा पसरवल्याने ५० हून अधिक लोकांना या भागातून अटक करण्यात आली आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेर्‍यानेही नजर ठेवली जात आहे.

तसेच मोटारसायकल चालवणाऱ्या निर्भया कमांडच्या महिला फोर्स आणि घोडेस्वार पोलिस कर्मचारीही दिवसभर लक्ष ठेऊन असतात. संपूर्ण भागात चारही बाजूंनी सील केले असून सरकारला आशा आहे की लवकरच राजस्थानमधील २००० पॉजिटीव्ह लोकांपैकी ४७३ लोक निगेटिव्ह आहेत. यापैकी सुमारे २०० जणांना रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे.