‘लेटलतिफ’ सरकारी कर्मचारी, अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांचा ‘दणका’, घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सरकारी काम, बारा महिने थांब’ ही म्हण आपल्या भारतातील कामकाजावरूनच तयार झाली असावी. कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर पहिल्याच खेपेत काम झाले असं क्वचितच घडले असेल. सरकारी काम कधीच वेळेत आणि लवकर होत नाहीत, हे सर्वश्रूत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कामकाजाच्या वेळा लवकर करत अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना लवकर येण्याची विनंती केली आहे. तसेच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी वेळेत न येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुधरवण्यासाठी नामी शक्कल काढली आहे. योगींनी अधिकारी वेळेत आले नाहीत तर त्यांचे पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी सकाळी ९ वाजता कार्यालयामध्ये न पोहोचल्यास पगार कापण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे.

अधिकारी वेळेत न आल्याने सरकारी कामांचा खोळंबा होतो. सकाळी लवकर काम घेऊन सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याचा मनस्ताप हा अनेकांना सहन करावा लागतो. त्यामुळे जनतेची चिडचिड होते, तसंच वेळही वाया जातो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ही शक्कल आजमवायची ठरवली आहे.

आता महाराष्ट्रातही अशीच काहीस चित्र आहे. सरकारी अधिकारी लंच टाईमला गेले की कधीच वेळेवर येत नाही. हे सर्वत्र दिसून येते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. मात्र यावर राज्य सरकारने आता राज्य सरकारनं कडक पाऊले उचलली आहेत. लंच टाईम वेळेत संपवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे सरकारी अधिकाऱ्यांना लंट टाईम अर्ध्या तासात संपवणं गरजेचं आहे, नाहीतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.