Video : ‘टिकटॉक’ करणं सरकारी कर्मचार्‍यांना महागात पडलं ; वरिष्ठांकडून बदली अन् पगारात कपात

हैदराबाद : वृत्तसंस्था – सध्या टिकटॉक करणं सर्वसाधारण झाले आहे. ते सर्वांना आवडूही लागले आहे. त्यामुळे सर्वच लोक मज्जा म्हणून हे बनवत आहेत. मात्र मज्जा म्हणून टिकटॉक करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र महागात पडले आहे. सरकारी कामाच्या वेळेत टीकटॉकचा व्हीडिओ केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत त्यांच्या दुसऱ्या विभागात बदली करण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्या पगारात कपातही करण्यात आली आहे.

तेलंगणा खमाम महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये एक मजेशीर व्हिडीओ बनवून तो टिकटॉकवर अपलोड केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हीडिओमध्ये गाणे गायले असून त्यात एका चित्रपटातील डायलाॅगही घेतले आहेत.

विशेष म्हणजे हा व्हीडिओ कामाच्या वेळेत केला आहे. त्यामुळे अनेकांनी यावर कंमेट्स केल्या आहेत. या व्हीडिओचे काहींनी समर्थन केले आहे, तर अनेकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या या व्हीडिओ बनवण्यावर आक्षेप घेतला आहे. तर अनेकांनी कार्यालयीन कामकाजापासून थोडा विरंगुळा असं म्हणत, असे काहींनी म्हटले आहे. तर, सरकारी नोकरदार कामापेक्षा फालतुपणा अधिक करतात, काम कमीच असते, असे म्हणत या व्हीडिओवर टीका केली आहे.

दरम्यान, केएमसी प्रशासनाने याची दखल घेत व्हिडीओतील कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी आर. व्ही. कर्नान यांनी करावाई केली आहे. त्याअंतर्गत या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पगारात कपात करून त्यांना दंड करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांची बदली करण्यात आली आहे.

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like