खुशखबर ! आता खासगी कर्मचार्‍यांना देखील मिळणार पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्राने नोकरदारांना दिलासा दिला आहे. वृत्तानुसार ईपीएफसह लवकरच पेंशन स्कीम घेणे देखील आवश्यक होणार आहे. म्हणजेच पीएफप्रमाणेच दर महिन्याच्या पगारातून पेंशन स्कीमसाठी पैसे कापले जाणार आहेत. किती पैसे कापले जाणार याचा निर्णय स्वत: कर्मचारी घेऊ शकतात.

काही वृत्तानुसार या निर्णयाने लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल. वित्त सचिव राजीव कुमार म्हणाले की, यासाठी लवकरच सिस्टम तयार करण्यात येईल आणि दरमहा कमीत कमीत 100 रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जातील, एवढेच नाही तर कंपनी देखील त्यांचा वाटा खात्यात जमा करु शकतात. त्यांचे म्हणणे आहे की जे तरुण आहेत ते उद्या वयोवृद्ध होतील. तेव्हा त्यांना या पैशांचा उपयोग होईल.

पीएफच्या बरोबरीने कापला जाणारे पैसे कधी मिळणार –
1. नोकरदार अनेकदा पीएफ खात्यामुळे चिंतीत असतात. विशेष करुन खासगी कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना ईपीएफसह मिळणाऱ्या पेंशनबाबत माहिती नसते. तज्ज्ञांच्या मते नोकरदारांच्या पगारातून कापली जाणारी रक्कम दोन खात्यात विभागली जाते.
2. पहिला प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच EPF आणि दुसरा फंड म्हणजे EPS. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाणारी 12 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या ईपीएफमध्ये जमा होते. याशिवाय कंपनीकडून 3.67 टक्के EPF मध्ये जमा होते आणि बाकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेंशन योजना (EPS) मध्ये जमा होते.
3. पीएफ खात्यांची रक्कम कोणताही कर्मचारी एका निश्चित वेळेनंतर काढू शकतो. परंतु, पेंशनची रक्कम काढण्यासाठी नवे नियम कठोर होतील, कारण हे वेगवेगळ्या स्थितीत निश्चित असतात.
4. जर नोकरी 6 महिन्यापेक्षा जास्त आणि 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी असेल. तर फॉर्म 19 आणि 10 सी जमा करुन पीएफ रक्कमेसह पेंशनची रक्कम देखील काढू शकतात, परंतु यासाठी मॅनुअल पद्धतीने पीएफ ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल.
5. ऑनलाइन प्रोसेसमध्ये सध्या पेंशन फंड काढण्याची सुविधा सुरु करण्यात आली नाही. फॉर्म भरल्यानंतर त्यांना एम्पॉयर म्हणजेच ईपीएफओच्या कार्यालयात जमा करावे लागेल.
6. जर तुमचा प्रॉव्हिडेंट फंड (पीएफ) एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रांसफर करतात तर मग तुमची कितीही सर्विस हिस्ट्री असेल तर तुम्ही पेंशनच्या रक्कमेला कधीही कोणत्याही परिस्थितीत काढू शकणार नाहीत.
7. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुमची सर्विस हिस्ट्री 10 वर्षांची होईल तर तुम्ही पेंशनसाठी क्लेम करु शकतात आणि 58 वर्षाच्या वयात तुम्हाला मासिक पेंशनच्या रुपात काही रुपये मिळतील.

अर्थसंकल्पात कायदा बदलण्याचे संकेत –
पीएफआरडीएला मजबूत करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी पीएफआरडीए कायद्यात संशोधनाचा प्रस्ताव केला आहे. सीतारामन यांनी कर्मचाऱ्यांच्या पेंशन समिती गठनची सूट देण्याचा प्रस्ताव आहे.

सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, पीएफआरडीएच्या नियमनाच्या भूमिका मजबूत करण्याची आवश्यकता आहे. पीएफआरडीए कायद्यात आवश्यक संशोधन केले जाईल. याद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना एनपीएससह पीएफआरडीएपासून वेगळे केले जाऊ शकेल.

याने काय होईल –
पेंशन कोष नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा सप्टेंबर 2013 मध्ये पारित झाला होता. जो 2014 मध्ये अस्तित्वात आला होता. अर्थमंत्री म्हणाल्या की यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांशिवाय दुसरे कर्मचारी देखील पेंशन समिती गठीत करु शकतील. त्या म्हणाल्या की, मला विश्वास आहे की यामुळे नागरिकांना मोठी योजना तयार करण्यास प्रोस्ताहन मिळेल. त्या म्हणाल्या की, याशिवाय यामुळे नोकरी दरम्यान मॉबिलिटी देखील वाढेल.