Government Pension Schemes | जर ‘या’ 4 सरकारी पेन्शन योजनांमध्ये केली असेल गुंतवणूक तर निवृत्तीनंतर राहणार नाही टेन्शन; जाणून घ्या किती मिळतो रिटर्न

नवी दिल्ली : Government Pension Schemes | जर तुम्हाला 60 वर्षानंतर म्हणजेच निवृत्तीनंतरची चिंता असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी सरकारने काही सरकारी पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. जर तुम्ही या सरकारी पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक केली तर 60 नंतर तुम्ही एक चांगले आयुष्य जगू शकता. (Government Pension Schemes)

 

सरकारच्या या पेन्शन योजनांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परताव्याची हमी आहे. या सेवानिवृत्ती पेन्शन योजनांबाबत जाणून घेवूयात…

 

1. NPS आणि APY योजना –

सरकारी कर्मचार्‍यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना 2004 मध्ये सुरू झाली. परंतु सरकारने 2009 मध्ये खासगी क्षेत्रासाठीही ती सुरू केली. NPS योजनेत नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवू शकता. दुसरीकडे केंद्र सरकारकडून असंघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला पेन्शन लाभाची हमी दिली जाते.

 

NPS आणि APY मध्ये कोण गुंतवणूक करू शकते?

राष्ट्रीय पेन्शन योजनेत (national pension scheme) गुंतवणूक करण्याचे वय 18 ते 70 दरम्यान आहे. कुणीही भारतीय नागरिक, ज्याचे वय 18 ते 40 दरम्यान आहे, तो अटल पेन्शन योजना (atal pension yojana) घेऊ शकतो. एपीएस योजनेत कुणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो, मग तो निवासी असो किंवा अनिवासी. तर केवळ भारतातील रहिवासीच अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतो.

 

2. प्रधानमंत्री वय वंदना योजना –

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा (pradhan mantri vaya vandana yojana) लाभ 10 वर्षानंतर मिळण्यास सुरुवात होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला FD पेक्षा जास्त व्याज दिले जाते. जे 7.4% आहे. त्याच वेळी, 10 वर्षे सतत लाभ मिळत राहतो. त्यामुळे प्रधानमंत्री वय वंदना योजना खूप लोकप्रिय होत आहे. (Government Pension Schemes)

जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले. तर दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळते. दुसरीकडे, जर पती-पत्नी दोघांनी मिळून या योजनेत गुंतवणूक केली आणि गुंतवणुकीची रक्कम 30 लाख रुपये असेल, तर पती-पत्नी दोघांनाही दरमहा 20 हजार रुपये मिळतील.

 

3. ज्येष्ठ नागरिक बचत योजना –

पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना Senior citizen savings scheme (SCSS)
सध्या 7.4% व्याज देत आहे जी नऊ वर्षांत तुमचे पैसे दुप्पट करते.
31 मार्च / 30 सप्टेंबर / 31 डिसेंबर रोजी ठेवीच्या तारखेपासून प्रथम 7.4% पीए व्याज देय असेल
आणि त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी व्याज देय असेल.

या योजनेत 1000 रुपयांमध्ये खाते उघडले जाऊ शकते आणि या योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
या योजनेत आधी पाच वर्षे, नंतर आणखी जमा करू शकता.

 

Web Title :- Government Pension Schemes | if you have invested in these government pension schemes there will be no tension after retirement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा