LIC पाठोपाठ आता ‘या’ सरकारी कंपनीतील ‘हिस्सेदारी’ विकणार मोदी सरकार, मिळवणार 1 हजार कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार खासगीकरणाच्या प्रयत्नात आहे. एलआयसीनंतर आता सरकार आणखी एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करणार आहे. एअर इंडिया, बीपीसीएल, भेलनंतर आता सरकार भारतीय स्टील प्रधिकरण लिमिटेड (सेल) मधील आपली भागीदारी विकणार आहे. या कंपनीतील निर्गुंतवणूकीकरणाने सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा फायदा होईल. ही विक्री ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून होईल. या प्रक्रियेंतर्गत सरकारी कंपन्यांमधील प्रमोटर्स स्वत:ची भागीदारी अगदी सहजरित्या गुंतवणूकदारांना विकू शकतात. यात पारदर्शकतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की स्टील मंत्रालय या निर्गुंतवणूकीसाठी सिंगापूर आणि हॉंगकॉंगमध्ये रोड शो करण्यासाठी तयार आहे. सेलमध्ये सरकारची 75 टक्के भागीदारी आहे.सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे देखील खासगीकरण करणार आहे. अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्र सरकारने एलआयसीची भागीदारी विकली आहे.

सरकारने निर्गुंतवणूकीतून 1.05 लाख कोटी रुपये मिळण्याचे लक्ष ठेवले आहे. परंतु हे लक्ष पूर्ण करण्याची सुतराम शक्यता नाही. अर्थसंकल्प 2020 दरम्यान 65 हजार कोटी रुपये कमावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सरकारने आयपीओच्या माध्यमातून एलआयसीची भागीदारी विकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की एलआयसीचा आयपीओ आणला जाईल. एलआयसी सरकारी सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करण्याशिवाय शेअर बाजारात देखील गुंतवणूक करत असते. त्यामुळे एलआयसीचा स्वत:चा आयपीओ फायदेशीर ठरेल.