पेट्रोल पंपावर असणार ई-वाहन ‘चार्जिंग’ स्टेशन, सरकारची तयारी सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्व पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन देण्याच्या सुविधेवर सरकार विचार करत आहे. नीति आयोग, पेट्रोलियम आणि वीज मंत्रालयाच्या सहकार्यातून सरकार ई-चार्जिंग स्टेशनसाठी योजना तयार करत आहे. प्रस्तावानुसार सर्व पेट्रोल पंपांवर ई-चार्जिंग स्टेशन लावल्याने इलेक्ट्रिक वाहनांना सहज चार्ज करता येईल. सुरुवातीला ही योजना मोठ्या शहरात लागू होऊ शकते.

एनटीपीसी, पॉवर ग्रिड सारख्या पीएसयूने अनेक ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन लावले आहेत, परंतू सरकार आता लवकर मोठ्या प्रमाणात ई-चार्जिंग स्टेशन लावण्याची तयारी करत आहे. सरकारने अनेकदा सांगितले आहे की इंफ्रास्ट्रक्चर उभारल्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करुन लक्ष साध्य होणार नाही. ई चार्जिंग स्टेशनबरोबरच पेट्रोल पंपवर बॅटरी स्वॉपिंगची सुविधा देण्यात येईल, तुम्ही तुमच्या वाहनाची बॅटरी देऊन चॉर्ज असलेली बॅटरी घेऊ शकतात.

सरकार २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक थ्री व्हिलर आणि टू व्हिलर आणणार बाजारात –

२०२३ पर्यंत इलेक्ट्रिक थ्री व्हीलर आणि २०२५ पर्यंत १५० सीसी पर्यंत ची इलेक्ट्रिक टू व्हीलर विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या या योजनेला ऑटो सेक्टर मधील प्रसिद्ध कंपन्या विरोध करत आहेत. कंपन्याचे म्हणणे आहे की देशात चर्जिंगच्या इंफ्रास्ट्रक्चर कमीच्या कारणाने इलेक्ट्रिक व्हेइकल विकणे सार्थक ठरणार नाही. कंपनीच्या या विरोधाला पर्याय म्हणून सरकार पेट्रोल पंपांवर चार्जिंगचे स्टेशन देण्याची योजना तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
कंपन्याच्या विरोधाला शांत करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक थ्री व्हीलर आणि टू व्हीलर सुरु करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत सर्वात आधी मेट्रोपोलिटन शहरात आणि सर्वाधिक प्रदूषण असणाऱ्या शहरात विकण्याची मान्यता असेल. त्यामुळे उत्सर्जन मानक लागू होतील आणि ऑटो सेक्टरमधील कंपन्याची चिंता देखील मिटेल.

गीगा स्केल बॅटरी निर्माणाला प्रोस्ताहन –

इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीसाठी नीति आयोगाने गीगा स्केल बॅटरी निर्माणाला प्रोस्ताहन दिले आहे. यासाठी नीति आयोगाने एक कॅबिनेट सूचना तयार केली आहे. या सूचनेमध्ये गीगा स्केल बॅटरी निर्माणावर काही सूट देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात आयकर वरील इन्सेटिव, कस्टम ड्युटी आराखडा यात बदल करण्याबरोबरच सूट देण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

म्हणून… साजरा केला जातो ‘डॉक्टर्स डे’ 

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर 

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ? 

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे