नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! EPFO बाबत सरकार घेणार मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या सामाजिक सुरक्षा संस्थांना कंपन्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सरकारने मसुदा जारी केला. त्याअंतर्गत या संस्थांमध्ये प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) यांची नेमणूक केली जाऊ शकते.

हा मसुदा ईपीएफओ आणि ईएसआयसीची रचना बदलण्याविषयी बोलले जात आहे. या दोन संस्थांना कंपनीचे स्वरूप दिले जाऊ शकते असे त्यात म्हटले आहे. सध्या, दोन्ही एजन्सी ट्रस्ट किंवा बोर्डद्वारे चालवल्या जातात आणि स्वायत्त संस्था म्हणून काम करतात.

अध्यक्ष (Chairman) आणि उपाध्यक्षांची (Vice Chairman) होणार नियुक्ती
मसुद्यात असे म्हटले आहे की, कंपनीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची सुद्धा निवड केली जाणार आहे. यात सीईओ सुद्धा नियुक्त केले जाणार आहेत जे संस्थांचे कार्यकारी प्रमुख असतील. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेनंतर भारतीय प्रशासनिक सेवेत नियुक्त केले जातील.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या संदर्भात सामाजिक सुरक्षा कोड 2019 चा मसुदा जारी केला आहे. यावर संबंधित पक्ष आणि सामान्य लोकांना 25 ऑक्टोबरपर्यंत आपले मत देण्यास सांगितले आहे.

2018-19 च्या पीएफ (EPF) वर 8.65 % व्याज मिळेल. लवकरच नोकरी करणाऱ्याच्याखात्यात पी एफ चे पैसे जमा होणार आहेत. मागच्या सहा महिन्यांपासून व्याज दर देण्याबाबत निश्चय करण्यात आला नव्हता. या आधी 2017-18 मध्ये व्याज दर 8.55 % होता. म्हणजेच व्याजदरात 0.10 % वाढ करण्यात आली.

Visit – policenama.com