PM मोदी यांची घोषणा ! दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) ओसरत आहे. परंतु अर्थव्यवस्थेचं (Economy) चक्र मंदावल्याने स्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला होता. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अशावेळी हातावर पोट असणाऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य free foodgrains देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत 80 कोटी गरीबांना मोफत धान्य free foodgrains दिलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मे व जूनपर्यंत लागू असलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) दिवाळीपर्यंत वाढवणार आहोत.
महामारीच्या काळात सरकार गरीबांच्या मदतीला त्यांचा बरोबरीने आहे.
नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे.
गरीबांना उपाशी झोपायला लागू नये अशी इच्छा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या (lockdown) पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना गुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार,

18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण
केंद्र सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात परवानगी दिली.
परंतु याची जबाबदारी राज्यांवर टाकली होती.
मात्र, आता 18 वर्षापुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे.
18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

काय म्हणाले PM मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, लसीकरणाची 25 टक्के जबाबदारी ही राज्य सरकारांची होती. ती जबाबदारीही भारत सरकार घेईल. येत्या 2 आठवड्यात ही व्यवस्था लागू केली जाईल. या दोन आठवड्यांत केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक तयारी करतील. भारत सरकार स्वत: लस उत्पादकांकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के खरेदी करुन ती राज्य सरकारांना विनाशुल्क देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय