Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान विमा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा ! 21 एप्रिल पर्यंत मिळाली ‘सवलत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. परंतु सरकारकडून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. यामुळेच 31 मार्च रोजी संपणाऱ्या बऱ्याच महत्त्वपूर्ण आर्थिक मुदतींची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये खासकरून वाहनांचा आणि आरोग्याचा विमा नूतनीकरणाची काळजी नागरिकांना भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना दिला दिला आहे. लॉकडाऊन दरम्यान संपणाऱ्या वाहन आणि आरोग्या विम्याचे प्रिमियम भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. म्हणजे मुदत संपलेले प्रिमियमचे 21 एप्रिल पर्यंत नुतनिकरण करण्याची परवानगी नागरिकांनी देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचे वाहनांचे आणि आरोग्याच्या विम्याचे प्रिमियम भरण्यास अडचणी येणार नाहीत. देशात 21 दिवसांचा म्हणजेच 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सरकारच्या या घोषणेमुळ ज्यांची विमा पॉलिसीची मुदत लॉकडाऊन दरम्यान संपत आहे. अशा पॉलिसी धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना देखील जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, ज्यांची थर्ड पार्टी मोटर विमा प्रिमियम भरण्याची तारीख लॉकडाऊन दरम्यान आली आहे. अशा पॉलिसी धारकांना त्यांचा प्रीमियम 21 एप्रिलपर्यंत भरता येणार आहे. तसेच त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. त्याचबरोबर आरोग्य विमा पॉलिसी भरण्यासाठी देखील 7 दिवसांची सूट देण्यात आली आहे.