खुशखबर ! २१ हजारांपेक्षा जास्त पगार असणार्‍या खासगी नोकदारांना आता पगार जास्त मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुम्हाला २१ हजार रुपयांपर्यंत पगार मिळत असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारने कर्मचारी राज्य विमा योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या अंशदानात कमी आणली आहे. हा निर्णय १ जुलै २०१९ पासून लागू होईल. या कमी नंतर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून जास्त पगार मिळेल.

पहिल्यांना मागील महिन्यापर्यंत ईएसआयच्या अंशदान रुपात एकूण ६.५ टक्के कपात करण्यात येते होती. यात कर्मचाऱ्यांचा वाटा १.७५ आणि ४.७५ टक्के वाटा कर्मचारी काम करत असलेल्या संस्थेचा होता. सरकारने यात कपात करुन ६.५ टक्क्यांवरुन कमी करुन ४ टक्के केले आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना ०.७५ टक्के अंशदान द्यावे लागेल. तर संस्थेला ३.२५ टक्के अंशदान द्यावे लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार १ टक्क्यांने वाढ मिळेल. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये प्रति महिना पगार मिळते, तर १ टक्के दराने त्यात २१० रुपये फायदा होईल. म्हणजेच जुलै महिन्यात तुमच्या पगारात २१० रुपये वाढ होईल.

अंशदानात कपातीमुळे कोणतीही सुविधा कमी होणार नाही –
लोकसभेत बोलताना रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले की अंशदानात कपाती नंतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधेत कोणत्याही प्रकारची कमी येणार नाही. गंगवार यांनी सांगितले की ईएसआयसीकडे ७० हजार कोटी रुपये आहे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात कोणत्याही प्रकारची कमी नाही.

यांना मिळेल लाभ –
ईएसआय योजनेचा लाभ त्या कर्मचाऱ्यांना मिळेल, ज्याचे मासिक उत्पन्न २१ हजार रुपये पेक्षा कमी आहे आणि जे कमीत कमी १० कर्मचाऱ्यांच्या कंपनीत काम करत असाल. २०१६ पर्यंत मासिक उत्पन्नाची सीमा १५ हजार रुपये आहे. जे १ जानेवारी २०१७ ला वाढवून २१ हजार रुपये करण्यात आले होते. ३१ मार्च २०१६ पर्यंत ईएसआयसीचे २.१ कोटी विमा सदस्य होते आता जवळपास ६ कोटी लोक आरोग्य योजनेचा लाभ घेतात.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप