शरद पवारांची सरकारी सुरक्षा काढल्याने राष्ट्रवादी ‘संतप्त’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरील सरकारी सुरक्षा व्यवस्था सरकारने २० जानेवारीला काढून घेतली. सध्या त्या ठिकाणी खासगी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तीन अधिकारी सहा सुरक्षागार्ड अशी सुरक्षा व्यवस्था होती. ती व्यवस्था काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, सुरक्षा व्यवस्था काढली बरं झालं, आज महाराष्ट्राला समजलं भाजप सरकार किती खोट्या मनोवृत्तीचे आहे ते.

शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढल्याने काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम, आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांचे सुरक्षा कवच आहे असे आव्हाड म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like