मोदी सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय, तुमच्या जीवनावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कॅबिनेट आणि सीसीईएच्या बैठकीत पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य करत इथेनॉलच्या किमतीमध्ये 5 ते 8 टक्केची वाढ करण्यात आली आहे. साखर निर्मितीमधून तयार होणार्‍या इथेनॉलची किंमत 62.65 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. बी हॅवीची किंमत 57.61 रुपये आणि सी हॅवीची किंमत 45.69 प्रति लीटर करण्यात आली आहे. याचा थेट फायदा शेतकर्‍यांना मिळेल. कारण इथेनॉल महागल्याने साखर कारखान्यांकडे जास्त पैसा येईल आणि ते ऊस उत्पादक शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पैसे देऊ शकतील.

सामान्यांवर पडणार भार

इथेनॉल महागल्याने पेट्रोलच्या किमती वेगाने वाढतील. देशात प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केले जाते. यामुळे इथेनॉलच्या दरात वाढ झाल्याने पेट्रोल महागणार आहे. ज्याचा थेट परिणाम सामान्यांवर होणार आहे. तर सरकारला आशा आहे की, 2021 नोव्हेंबरपर्यंत इथेनॉलचे उत्पादन दुप्पट होईल.

जूट पॅकेजिंगबाबत मोठी घोषणा

केंद्रीय कॅबिनेटने गुरुवारी जूटच्या बॅगांना प्रोत्साहन देण्यासाठी अन्नधान्याचे सामानसाठी जूटच्या बॅगांमध्ये पॅकिंग केले जाईल. आता धन्नधान्याची शंभर टक्के पॅकिंग जूटच्या गोणींमध्ये आणि साखरेच्या वीस टक्के सामानाचे पॅकिंग जूटच्या बॅगांमध्ये होईल. सामान्यांसाठी जूटच्या बॅगांचे दर कमी होतील, याचा निर्णय कमिटी घेईल. कॅबिनेटच्या या निर्णयामुळे जूटची मागणी वाढेल आणि जूटच्या शेतीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेशच्या जूट उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होईल.

डॅमबाबत झाला मोठा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील निवडक 736 धरणांची सुरक्षा आणि संचालनात सुधारणा करण्यासाठी बाह्य सहकार्य प्राप्त धरण पुनर्वसन आणि सुधारणा योजनांच्या दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्याला मंजूरी दिली आहे. या योजनेवर एकुण 10,211 कोटी रुपये खर्च केले जातील. या योजनेला एप्रिल 2021 पासून मार्च 2031 पर्यंत लागू केले जाईल.