2,000 रुपयांच्या नोटा ‘बंद’ करण्याबाबत सरकारकडून देण्यात आलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारची 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची कोणतीही योजना नाही. अर्थ आणि कॉर्पोरेट राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर दिले. त्यात ते म्हणाले की, सरकारची सध्या 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची कोणतीही योजना नाही.

त्यांना विचारण्यात आले की, सरकार टप्प्याटप्प्याने 2,000 रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का ? यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदाचा निर्णय घेत 500 आणि 1000 रुपयांचा जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आला.

नोटांच्या एकूण सर्कुलेशनच्या 31.18 टक्के नोटा 2,000 रुपयांच्या –
आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार सांगण्यात आले की, 31 मार्च 2019 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटांचे सर्कुलेशन एकूण नोटांच्या सर्कुलेशनच्या 31.18 टक्के होते. एकूण नोटांच्या सर्कुलेशनचे मुल्य 21,109 अरब रुपये आहे आणि यात 2000 रुपयांच्या नोटांने मुल्य 6,582 अरब रुपये आहे.

कमी होत आहे 2000 रुपयांची साठेबाजी –
प्राप्तीकर विभागाने मागील तीन वर्षात 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त केली आहे. तर जप्त करण्यात आलेल्या एकूण रोख रक्कमेत आर्थिक वर्ष 2017 – 18 मध्ये 2,000 रुपयांच्या 67.91 टक्के नोटा जप्त करण्यात आल्या. 2018 – 19 मध्ये हा आकडा 65.93 टक्के होता तर सध्याच्या आर्थिक वर्षात 43.22 टक्के आहे.

मागील महिन्यात भारत सरकारचे आर्थिक प्रकरणातील माजी सचिव एससी गर्ग म्हणाले की, 2,000 रुपयांच्या नोटा बाजारातून सहज काढून घेतल्या जाऊ शकतात. त्यांनी दावा केला की लोकांनी 2 हजारांच्या नोटा जमा केल्या आहेत, ज्यामुळे चलनात 2,000 नोटा कमी झाल्या.

Visit : policenama.com