सरकारी शाळेत मदरशा सारखी प्रार्थना, मुख्याध्यापक निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील एका सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना जबरदस्तीने सरस्वतीच्या प्रार्थनेऐवजी मदरसामधील प्रार्थना म्हणायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुरकान अली असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मात्र घडलेल्या या प्रकारावर विश्व हिंदू परिषद आणि दुसऱ्या हिंदू संघटनांनी मोठा विरोध दर्शविला आहे आणि याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हिंदू संघटनांनी पिलिभीत येथील जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांच्याकडे निवेदन देत शाळेत विशिष्ट धर्माची प्रार्थना घेतल्यामुळे कारवाईची मागणी केली आहे. ज्यावेळी हिंदू संघटनांकडून याला विरोध झाला होता त्यावेळी शिक्षकांनी वरिष्ठांची याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले होते.

जिल्ह्याधिकाऱ्यानी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक तपासाबाबतचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार अली यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत बोलताना फुरकान अली म्हणाले की, आमच्या शाळेत सरस्वती वंदना देखील केली जाते परंतु 90 % विद्यार्थी मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर शाळेत मुस्लिम प्रार्थना देखील केली जाते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी