सरकारचा मोठा निर्णय ! आता बिटकॉईनमध्ये केले ट्रांजक्शन तर सांगावे लागेल कारण, द्यावी लागेल पूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिप्टोकरन्सीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी व्यवहाराचा खुलासा अनिवार्य केला आहे. आता कंपन्यांना आपल्या क्रिप्टोकरन्सीमधील व्यवहाराचा खुलासा करावा लागेल. कॉर्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालयाने कंपनी कायद्यात ऑडिट, ऑडिटर आणि खात्यांशी संबंधीत विविध नियमांमध्ये दुरूस्ती केली आहे. कंपनी कायदा-2013 च्या शेड्यूल तीनमध्ये बदलाशिवाय खुलावा अनिवार्य केला आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये कंपनीच्या व्यवहाराच्या माहितीचा सुद्धा समावेश आहे.

1 एप्रिलपासून लागू होणार नियम
कंपनी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या कार्पोरेट मंत्रालयाने हे बदल अधिसूचित केले आहेत. हे बदल एक एप्रिलपासून प्रभावी होतील. एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, जर कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार केला, तर यामध्ये पारदर्शकता असायला हवी. हिच माहिती दिली पाहिजे की, अशा प्रकारच्या व्यापार हालचालीतून किती पैसे मिळवण्यात आले.

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर चिंता कायम
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, केंद्रीय बँकेला बाजारात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराची चिंता आहे. आरबीआयने याबाबत सरकारला कळवले आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, या प्रकरणात केंद्रीय बँक आणि अर्थ मंत्रालयामध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि दोन्ही आर्थिक स्थिरतेसाठी प्रतिबद्ध आहेत. आम्हाला याबाबत केंद्राकडून अंतिम निर्णयाची प्रतिक्षा केली पाहिजे.

क्रिप्टोकरन्सीबाबत सरकारकडून काही संभ्रम निर्माण करणारे संकेत आल्याने दास यांनी असे म्हटले आहे. या प्रकारच्या चलनात होणारा मोठा चढ-उतार पहाता त्यास पूर्णपणे प्रतिबंधीत करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, सरकारने बिटकॉईन सारख्या चलनाबाबत काहीशी मवाळ भूमिका दाखवली आहे.