….तर राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिवस म्हणून पाळणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शारीरिक शिक्षण शिक्षक शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या व्यवस्थेतून कायमचा बाद होऊ पहात असून, शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आ.किशोर दराडे, आ.सुधीर तांबे, ना.राधाकृष्ण विखे पा., शिक्षण मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पद्मभूषण अण्णा हजारे, अप्पर सचिव वंदना कृष्णा, सचिव चारुशिला चौधरी यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगष्ट राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, इशारा देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, आप्पासाहेब शिंदे, राजेश जाधव, महेंद्र हिंगे, सुनील गागरे, शिरीष टेकाडे, नंदकुमार शितोळे, मिलिंद पाटील, ज्ञानेश्‍वर रसाळ यांचा समावेश होता.

विदयार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व सांस्कृतिक विकासासाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषय शालेय स्तरावर महत्वाचे विषय आहे. या विषयाच्या अध्यापनाने विद्यार्थ्यात आरोग्य विषयक बाबींची जाण निर्माण होऊन खेळातून शारीरिक सुदृढते बरोबर विजय-पराजय पचविण्याची क्षमता दृढ होते. जीवनाच्या संघर्षात खडतर परिस्थितीशी मुकाबला करण्याचे बळ खेळातून व विषयाच्या अध्यापनाने मिळते. म्हणूनच विदयार्थ्यांच्या सुदृढ व निरामय जीवनासाठी शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण विषय व तो विषय शिकविणारा शिक्षक अतिशय महत्वाचा असल्याचे महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. संच मान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षक अतिरीक्त करु नये, निवड श्रेणी साठी एमपीएडची जाचक अट रद्द करण्यात यावी, शारीरिक शिक्षकाची बायफोकल पद्धतीने भरती करण्यात यावी, प्रत्येक शाळेत एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावा, इयत्ता ५ वी ते १२ वी वर्गासाठी शारीरिक शिक्षण विषयास किमान सहा तासिका देण्यात याव्यात, वेळापत्रकाव्यतिरिक्त वेळ शिक्षकाच्या कार्यभारात पकडण्यात यावा, खेळाडू अपघात विमा लागू करावा, शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या रिक्त पदावर शारीरिक शिक्षण शिक्षकाचीच पदभरती करावी, मेगा भरतीमध्ये पूर्ण कार्यभाराची जाचक अट रद्द करून वंचितांना सामावून घेत भरतीतील त्रुटी दूर कराव्यात, शिक्षकांना अत्युच्च कामगिरीबाबत अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी, क्रीडा धोरणातील सर्व तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

शाळेत क्रीडा शिक्षक टिकावा व विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणाचे धडे मिळावे म्हणून विषय व विषय शिक्षक महत्वाचे असल्याने या प्रश्‍नी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन अण्णा हजारे यांनी दिले. शारीरिक शिक्षण शिक्षकांना संचमान्यतेत पद स्थापना न मिळाल्यास व मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगष्ट राष्ट्रीय क्रीडा दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन ५ सप्टेंबर शिक्षक दिन व शालेय क्रीडा स्पर्धेवर महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीमार्फत बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी आनंद पवार, हनुमंत गिरी, संजय भुसारी, घनश्याम सानप, रमाकांत दरेकर, अजित वडवकर, राज गवांदे, सचिन पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला ‘बटाटा’ लावा आणि मिळवा ‘तजेलदार’ त्वचा

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला

पोलिसांनी विनाकारण अटक केल्यास ‘या’ कायद्यांमुळे मिळेल संरक्षण

जातिवाचक शिवीगाळ करणे पडले महागात, मुख्याध्यापिका आणि वर्ग शिक्षिकेला कैद