शेतकरी आंदोलनं गांभीर्याने घ्या, अन्यथा …शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला इशारा

पोलीसनामा ऑनलाईनः कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यावे, अन्यथा सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी ते चांगले चांगले नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

पवार म्हणाले, मला वाटते केंद्र सरकारने संपूर्ण शेतकरी आंदोलन अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवे. यावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जाऊ शकतो. मी असे देखील ऐकले आहे, की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगलं राहाणार नाही.

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी युपीएच्या काळातीस तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत. मात्र, आता या सुधारणा घडून येऊ पाहत आहेत तर शरद पवार त्याला विरोध करत आहेत.