आयकर अधिकार्‍यानंतर IAS, IPS अधिकारी मोदी सरकारच्या रडारवर, 21 अधिकार्‍यांची यादी ‘रेडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRS सेवेतील १२ अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता सरकारने भारतीय प्रशासकिय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ज्यांच्याविरोधात अनियमितता, शिस्तभंग, आणि भ्रष्टाचाराची जास्त कालावधीपासून चौकशी प्रलंबित आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान कार्यालयातून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली आहे.

२१ अधिकाऱ्यांची यादी तयार

पंतप्रधान कार्यालयाच्या कार्मिक विभागाने (DOPT) आणि गृह विभागाने यासंदर्भात चर्चा करून २१ अधिकाऱ्यांची यादी तयार केली आहे. ज्यांच्याविरोधात मोठ्या कालावधीपासून चौकशी सुरु आहे. अशा अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. काही राज्यांनी आपल्या कॅडरमधील अधिकाऱ्यांची नावे केंद्राला पाठवली आहेत. यात १० IPS तर ११ lAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांविरोधात सीबीआय, आयकर, ईडी यांच्यामार्फत सुरु असलेल्या चौकशीचे स्टेटस रिपोर्ट मागविण्यात आले आहेत. तर हे स्टेटस रिपोर्ट प्राप्त होताच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

सेवानिवृत्त झालेले असल्यास त्याची सीबीआयकडे चौकशी

आएएस अधिकाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. आयएएस कॅडर केंद्रीय गृहमंत्रालय तर आयपीएस कॅडर पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित डिओपीटी कडून नियंत्रित केले जाते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांच्या कॅडरच्या कंट्रोलिंग अथॉरिटीच्या आदेशानंतर कारवाई करण्यात येणार आहे. यातील अधिकारी जर सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्याविरोधातील चौकशी सीबीआयमार्फत केली जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

जेलीफिशचा धोका ! रूग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची मागणी

किमोथेरपी म्हणजे काय ? ती कर्करुग्णांसाठी वरदान ठरते का ?

रूग्णांना सुरक्षित रक्त मिळतेय का ?आधुनिक तपासणी गरजेची

प्राण्यांसाठी हव्यात ‘रक्तपेढ्या’