आता मोबाईल फोनव्दारे ‘दान’ करू शकाल उरलेलं ‘अन्न’, राष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी सुरू होणार व्यवस्था, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अनेकांना आपल्या परिस्थितीमुळे उपाशी पोटी झोपावे लागते तर काही लोक अशा पद्दतीने जेवतात की, अर्ध जेवण ताटातच शिल्लक ठेवतात. लग्नामध्ये, मोठं मोठ्या समारंभात अनेकदा खूप सारे जेवण वाया जाते अनेकांना हे उरलेले जेवण दान करायचे असते परंतु योग्य वेळी योग्य ठिकाणी असे लोक उपलब्ध होत नाहीत परंतु आता लोक आपल्याकडे उरलेले जेवण दान करू शकतात.

फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स एथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने यासाठी नैसकॉम (NASSCOM) सोबत मिळून काम करायला सुरुवात केली आहे. योजनेनुसार लवकरच एक अ‍ॅपची निर्मिती केली जाईल. ज्यामध्ये अशा काही संघटना जोडलेल्या असतील ज्या लोकांपर्यंत जेवण पोहचवतील. सुरुवातीला 81 संघटनांना यासाठी जोडण्यात येणार आहे. जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती या अ‍ॅपवर आपल्याकडे शिल्लक असलेल्या जेवणाची माहिती देऊ शकेल.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर एक हेल्पलाईन सुद्धा यासाठी सुरु करण्यात येणार आहे. हा नंबर चोवीस तास सुरु असेल जेणेकरून कोणाकडेही खाद्यपदार्थ शिल्लक असतील तर ती व्यक्ती हवे तेव्हा फोन करू शकेल. फोन करताच तुमच्याकडे एनजीओचे लोक येऊन अतिरिक्त जेवण घेऊन जातील आणि गरजू लोकांपर्यंत पोहचवतील. यासंबंधीची एक अधिकृत वेबसाईट देखील लवकरच बनवली जाणार आहे ज्यावर याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/