home page top 1

‘या’ दोन सरकारी कंपन्या होणार बंद, वाणिज्य मंत्रालयाने केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या सरकारी कंपन्यांची यादी तयार केली असून यामधील स्टेट ट्रेडिंग काॅर्पोरेशन म्हणजेच STC आणि इक्विपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेड PEC या दोन कंपन्या लवकरच बंद करणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासाठी नोट देखील तयार करण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या दोन कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. या दोन्ही कंपन्या विशिष्ट कालावधीत बंद करण्यासाठी सरकारने नोट देखील तयार केली आहे. मंत्रिमंडळाची परवानगी मिळाल्यानंतर लगेच या कंपन्या बंद केल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

स्टेट ट्रेडिंग काॅर्पोरेशनचे शेअर 19 टक्क्यांपर्यंत घसरले –

हि कंपनी बंद होण्याच्या बातमीने कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून 19 टक्क्यांपर्यंत यामध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी देखील शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली होती. त्यामुळे बँकांनी देखील कंपनीला बुडीत कर्जामध्ये समावेश केल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास देखील अडचण येत आहे. त्यामुळे सरकारने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या कंपनीवर 1,906 कोटी रुपये कर्ज आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीतील अनेक प्रलंबित ठेके आणि व्यवसाय देखील सरकार लवकरच सार्वजनिक कंपन्यांना देणार आहे. एसटीसी कंपनीची स्थापना 1956 मध्ये झाली होती. पूर्व युरोपमध्ये इतर देशांशी व्यापार करण्यासाठी सरकारने या कंपनीची स्थापना केली होती.

Loading...
You might also like