लोकसभेत सरकारनं सांगितले कोणत्या वयाचे किती लोक कोणती नशा करतात, जाणून घ्या

नवी दिल्ली : ड्रग, नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आणि बॉलीवुडवरून सध्या देशात गोंधळ सुरू आहे. रोज नवीन खुलासे होत आहेत. या दरम्यान केंद्र सरकारने सुद्धा लोकसभेत व्यसनाबाबत आकडे सादर करून आश्चर्यकारक खुलासा केला आहे. सामाजिक न्याय आणि आधिकार मंत्रालयाने आकडे सादर करताना सांगितले की, देशात सध्या कोणत्या वयाचे किती लोक कोणती नशा करत आहेत.

अल्पवयीन मुलांबाबत दिलेले आकडे खुपच धक्कादायक आहेत. कशाप्रकारे अल्पवयीन मुलं वेदना दूर करणार्‍या औषधांचा नशेसाठी वापर करत आहेत, याचाही धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारी आकडे सांगतात की, 15 कोटी अल्पवयीन केवळ अल्कोहलचे शौकीन आहेत.

मुलांच्या बाबतीत भितीदायक आकडे
सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाच्या आकड्यानुसार, देशात 10 ते 17 वर्ष वयाची 40 लाख मुले ओपियाडची नशा करतात. ओपियाड अंतर्गत ती नशा येते, जी सामान्यपणे माणसाला वेदना दूर करण्यासाठी औषध म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जाते. जसे की, वेदना दूर करणार्‍या टॅबलेट आणि झोपेसाठी दिलासा देणारे इंजेक्शन इत्यादी. परंतु, नशा करणार्‍यांना याचे व्यसन लागते. आपल्या हातानेच ते इंजेक्शन घेऊ लागतात. अशाप्रकारची नशा मुलांच्या मेंदूवर आणि शरीराच्या नसांवर गंभीर परिणाम करते.

इन्हेलेंट आणि अल्कोहलच्या प्रकरणात मुलांचा आकडा 30-30 लाख आहे. इन्हेलेंटच्या रूपात मुले व्हाईटनर, थिनर आणि शूज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे एक सोल्यूशन कपड्यावर ठेवून ते वास घेतात. 18 वर्षांपेक्षा मोठेसुद्धा ही नशा करत आहेत. मंत्रालयाचा आकडा सांगतो की, अल्पवयीन असलेले 60 लाख लोक अशाप्रकारचे व्यसन करत आहेत. मोठ्यांमध्ये अल्कोहलनंतर याचाच नंबर येतो. तर 30 लाख मुले दारू आणि टिंजर-जिंजरच्या रूपात अल्कोहल घेत आहेत.