कोरेगाव भीमात शासकीय नियम तुडविले पायदळी ! कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत विना मास्क कार्यक्रम

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा Koregaon Bhima येथे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शिव राज्याभिषेक सोहळा संपन्न करत ग्रामपंचायत इमारतीवर गुढी उभारली मात्र यावेळी सर्वांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसून आले असून अनेकांनी मास्क चा वापर देखील टाळला असल्याने आता शिक्रापूर पोलीस यावर गुन्हे दाखल करणार की राजकीय दबावाला बळी पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. कोरेगाव भीमा Koregaon Bhima ता. शिरुर येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यासाठी अनेक पदाधिकारी ऐकत्र आले होते.

Coronavirus in Dharavi : हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनं थोपवली ‘कोरोना’ची दुसरी लाट, रविवारी आढळले एवढे रुग्ण

दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयावर गुढी उभारण्यात आली,
परंतु आदर्श असा कार्यक्रम होत असताना अनेकांना कोरोनाचा तसेच,
शासकीय नियमांचा विसरच पडला.
त्यामुळे काही नागरिकांनी विना मास्क राहणेच पसंत केले होते.
तसेच सोशल डीस्टंस कोठेही पहावयास मिळाले नसल्याने,
कोरेगाव भीमा Koregaon Bhima ग्रामस्थांना कोरोनाचे भय आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परंतु कलम १४४ लागू असताना नागरिकांनी नियम पायदळी तुडविले असताना,
कोरेगाव भिमातच नव्या गाडीची गर्दी करुन काही नागरिकांनी मास्कचा वापर न करता पूजा केली. म्हणून कार मालका सह अनेकांवर आनंदाच्या क्षणी देखील गुन्हे दाखल करुन कायद्याचा धाक दाखविणारे प्रशासन तसेच शिक्रापूर पोलीस चक्क गप्प का ?,
असा देखील प्रश्न उपस्थित केला जात असून मास्क चा वापर केला नाही.
म्हणून पावत्या करणारे तसेच गुन्हे दाखल करणारे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हे कृत्य दिसून आले नाही का असा प्रश्न निर्माण झालेला असून,
घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस गुन्हे दाखल करणार की राजकीय दबावाला बळी पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या