सरकाने गोरगरिबांना रोख मदत द्यावी, राहुल गांधी यांची मागणी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गोरगरिबांना रोखीच्या स्वरूपात मदत करावी आणि औद्योगिक क्षेत्राला करामध्ये सवलती देऊन बेरोजगारी रोखावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

सद्यस्थितीत गोंधळ वाढू नये यासाठी गरीब आणि रोजंदारीवरच्या लोकांना थेट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. देशातील शहरी भागात आपत्कालीन सेवा देणारी रुग्णालये उभी करावीत आणि त्यात आयसीयू ची व्यवस्था असावी अशीही सूचना गांधी यांनी केली आहे.

कोरोना बाधितांवर तातडीने उपचार होण्यासाठी संशयितांची चाचणी त्वरित होऊन त्यांच्यावर लगेचच उपचार होणे गरजेचे असल्याने मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे असेही गांधी यांनी सांगितले..

You might also like