अलर्ट ! जर तुम्हालाही KYC साठी कॉल अथवा SMS येतोय?; सरकारकडून सावधनतेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनामुळे अनेक कडक निर्बंध लावली गेलीत. यामुळे सर्वच लोक मोबाईलमध्ये व्यस्त झालीत. इंटरनेटचा वापर अवाढव्य होऊ लागला. या कारणाने मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने  याबाबत सूचना आणि सावधानतीचा इशारा दिला आहे. तर सरकारच्या सायबर दोस्त नावाच्या ट्विटद्वारे जनतेला दक्ष राहण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने ट्विटच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, सायबर गुन्हेगार KYC बाबत बनावट काही सांगून नागरिकांना जाळ्यात अडकविण्याचे काम करत आहेत. तसेच, लोकांनी KYC / रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप फसवणूकीपासून सतर्क राहण्याचे सांगितले आहे.

तसेच, मुख्य म्हणजे सध्या फसवणूक करणारे जे गुन्हेगार आहेत, ते कॉल (call) अथवा एसएमएस (SMS) करुन KYC करण्याच्या नावाखाली लोकांना फसवत आहेत.

दरम्यान, कॉल आणि SMS करून लोकांकडून पर्सनल माहिती काढली जाते.

येणाऱ्या कोणत्याही CALL , मेसेज अथवा EMAIL वर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, लोकांनी अशी कसलिही माहिती देऊ नये.

आणि कसली चूक सुद्धा करू नये. असा सावधानतीचा इशारा गृह मंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

 

 

 

KYC कॉल अथवा SMS येत असेल तर सावधान…
ज्यावेळी आपल्याला KYC साठी कुठलाही कॉल अथवा SMS याबाबत ताबडतोब सावध राहणे उचित ठरणार आहे.

तसेच, KYC नसल्यामुळे आपले बँक अकाउंट बंद होणार आहे.

असा सांगत्याला कुठलाही SMS आल्यास त्याला बळी न पडता सावधान राहणे उचित असणार आहे.

असा मेसेज येत असेल तर सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्यासंदर्भात सविस्तर माहिती गृह मंत्रालयाकडून दिली आहे.

मोबाईलवर कसलीही माहिती अथवा पर्सनल माहिती देऊ नये असे देखील मंत्रालयाने सांगितले आहे.

दरम्यान, या शिवाय आपल्या मोबाईलवर अनॅडेस्क (Anydesk ) अथवा टीम व्ह्यूअर सारखे कोणतेही app डाउनलोड करणे पूर्णपणे टाळावे.

आपण अशा अ‍ॅपसह आपल्या डिव्हाइसवर Remote access देत असल्यास, फसवणूक करणार्‍यांना आपला PIN, OTP, Bank खात्याचा तपशील आदी माहिती मिळू शकणार आहे.

म्हणून तुम्ही योग्य वेळी सतर्क राहा असं सांगितलं आहे.

बनावट sms टाळा –

फसवणूक होऊ नये यासाठी बनावट मेसेजसंदर्भात सावधानतीच्या सूचना सरकरकडून मिळत आहेत.

परंतु, व्यक्तीने अनोळखी नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये.

तसेच महत्वाचे म्हणजे आलेल्या अशा sms अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे.

Also Read This : 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

 

पुढील 3 तासात पुण्यासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा