सरकारकडून WhatsApp युजर्सना ‘इशारा’, ‘या’ 8 गोष्टी जाणून घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या कंप्युटर एमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला सावधान राहण्याचा आवाहन केले आहे. सीईआरटीने सांगितले की भारतात नवा व्हायरस आल्यानंतर हॅकरला कंप्युटर आणि स्मार्टफोन हॅक करणे सोपे झाले आहे.

या व्हायरस बाबत फेसबूकने देखील मागील आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपला सुरक्षेच्या कारणास्तव चेतावणी दिली होती. फेसबुकने सांगितले होते की व्हॉट्सअ‍ॅप स्टक बेस्ड बफर ऑवरफ्लो वर हल्ला होऊ शकतो, जे हॅकर विशेष करुन व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सला MP4 फाइलच्या माध्यमातून त्यांच्या डिवाइसमध्ये व्हायरस पाठवतात.

सीईआरटीने व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित दिलेली चेतावनी –
1. सुरक्षेच्या कमतरतेमुळे हॅकर सहज MP4 फाइलच्या माध्यमातून यूजरच्या व्हाट्सअ‍ॅपमध्ये घुसू शकतात.

2. काय आहे MP4?

या फाइल एक्सटेंशनचा एक प्रकार आहेत. जे व्हिडिओ, ऑडिओ आणि सबटाइट्ल्स सारख्या फॉर्मेटमध्ये असतात.

3. या प्रकारच्या व्हायरसकडे यूजर्सचे जास्त लक्ष जात नाही. जेव्हा कोणत्याही प्रकारची घातक फाइल यूजर्सच्या डिवाइसमध्ये डाउनलोड होते तेव्हा हा व्हायरस यूजर्सच्या डिवाइसमध्ये येतो.

4. या प्रकारच्या व्हायरसचा वापर करुन हॅकर सहज यूजरच्या व्हॉट्सअ‍ॅपला वापरु शकतात.

5. हॅकर व्हॉट्सअ‍ॅप सिक्युरिटीच्या मालवेअरच्या माध्यमातून यूजर्सच्या डिवाइसमधून फाइस्ल चोरी करु शकतात, ज्यानंतर फाइलचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ शकतो.

6. हॅकर लांबूनच यूजरच्या डिवाइसला रिमोटच्या माध्यमातून नियंत्रित करु शकतात. रिमोट कोड एक्सिक्युशन हा एक प्रकारचा कोड आहे. ज्याद्वारे यूजरच्या डिवाइसमध्ये हॅकर सह घुसू शकतात.

7. डिवाइस जिओग्राफिकली कुठेही स्थित होऊ शकते.

8. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला काय करावे लागेल –

इंडियन कंप्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम यूजर्सला WhatsApp च्या नव्या वर्जनला अपग्रेड करण्याचा सल्ला देत आहे.

Visit : Policenama.com