फायनल ! शिवसेनेच्या नेतृत्वात 1 डिसेंबरला सरकार स्थापन होईल : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा संभ्रम लवकरच दूर होणार आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशा विविध पक्षांत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षते खालील सरकार कार्यभार स्वीकारेल अशी माहिती शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. यावेळी आमदारांना नवीन मार्गांनी आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताचे खंडन करताना राऊत म्हणाले की, ‘षडयंत्र तेच रचत आहेत ज्यांना शिवसेना सरकारची स्थापना बघायची नाही.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील का असा माध्यमांनी राऊत यांना सवाल केला. यावर राऊत म्हणाले, ‘सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात अनेक नेते आपापल्या राज्याचे प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार भेटणार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणाताही नेता पंतप्रधानांना भेटू शकतो. उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींना भेटू शकतात.’

Visit :  Policenama.com