‘संपूर्ण देशात लवकरच ‘NRC’ लागू’, गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

रांची : वृत्तसंस्था – भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एनआरसी ( National Register of Citizens ) पूर्ण देशभर लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गृहमंत्री शहा यांनी प्रश्न विचारला की, असा कोणता देश आहे का..? जो आपल्या देशात विदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे राहण्यास परवानगी देईल.

NRC म्हणजे काय
नेशनल रजिस्टर ऑफ़ सिटिजन म्हणजे एक असे रजिस्टर आहे. ज्यामध्ये देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या ओळखीसंबंधीची एक सूची असेल. जी हे निर्धारित करेल की, देशामध्ये राहणारे खरे नागरिक कोण आहेत. या संबंधीच्या सर्व माहितीचा यात समावेश केला गेलेला असेल.

रांची मध्ये एका हिंदी वर्तमानपत्राच्या कार्यक्रमात शहा म्हणले की, एखादा भारतीय अमेरिका , ब्रिटन आणि रशिया मध्ये जाऊन बेकायदेशीरपणे राहू शकेल का..? तर नक्कीच नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या देशातील नागरिक कुठल्याही ओळख प्रमाणपत्राशिवाय आपल्या देशात कसे काय राहू शकतील..? त्यामुळे मला असे वाटते की, एनआरसी पूर्ण देशभर लागू केले गेले पाहिजे.

सबंध देशभर लागू होणार एनआरसी
शहा म्हणाले की, आम्ही एनआरसीला आसाम नंतर पूर्ण देशभरात लागू करणार आहोत. लवकरच आम्ही नॅशनल रजिस्टर ऑफ़ सिटिजन तयार करणार आहोत. यामध्ये देशात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची एक सूची असेल. असेही हे एनआरसी आहे, ना की आसाम रजिस्टर ऑफ सिटीझन. असे शहा म्हणाले.

आसाम एनआरसी वर शहांनी मांडली आपली भूमिका
आसाम मध्ये एनआरसी च्या फाईल सूचीमधून बाहेर झालेल्या १९ लाख लोकांबाबतचा निर्णय योग्य होता की अयोग्य हे फॉरेनर्स ट्रिब्युनल (Foreigners Tribunal) ठरवेल. कारण की, जे लोक यामधून बाहेर राहिले आहेत त्यांच्यासाठी आणखी एक संधी मिळेल. जी की त्यांना फॉरेनर्स ट्रिब्युनल समोर आपली बाजू मांडण्याची साधी देईल. ज्या लोकांकडे वकिलांना नेमण्यासाठी पैसे नसतील त्यांना आसाम सरकार वकील उपलब्ध करून देणार आहे. या महिन्याच्या सुरवातीला गृहमंत्री शहा यांनी ईशान्येकडील देशांचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी असे आश्वासन दिले होते की, पुन्हा एकदा सिटिजनशिप अमेडमेंट बिल (Citizenship Amendment Bill-CAB) ते घेऊन येणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी एनआरसी देशभर लागू होणार असल्याचे सांगितल्यानंतर देशभर यावरून चर्चा सुरु होणार आहे. सुरवातीला असे वाटले होते की, एनआरसी हे केवळ आसाम राज्यासाठी आहे आता एनआरसी पूर्ण देशाला लागू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर लोकांना त्यासाठी तयार व्हावे लागणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like