मोदी सरकार ‘या’ वस्तुंवरील टॅक्स वाढवणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वस्तू आणि सेवा करातून मिळणारा महसूल वाढवण्यासाठी सरकारने तंबाखू उत्पादनांवर आणि कोळशासारख्या इतर वस्तूंवर टॅक्स वाढवण्याचा विचार सुरु केला आहे. सचिव समितीत पहिल्या बैठकीत टॅक्स कलेक्शनची भरपाई करण्यासाटी निवडक उत्पादनांचा टॅक्स वाढवण्यावर चर्चा केली. या शिफारसीवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत होईल. एप्रिल ते ऑगस्ट 2019 च्या दरम्यान जीएसटीची ग्रोथ 1 टक्क्यांने झाला.

जीएसटी कलेक्शनमध्ये ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जवळपास 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. ऑगस्टच्या जीएसटी कलेक्शनची रक्कम 98,202 रुपये झाली जी सप्टेंबर महिन्यात कमी होऊन 91,916 कोटी रुपये झाली होती.

जीएसटी रेवेन्यू कलेक्शन आणि जीएसटी स्ट्रक्चरवर सूचना देण्यासाठी सचिवांच्या समितीची मंगळवारी पहिली बैठक झाली होती, त्यात या बाबींवर चर्चा झाली की अनेक राज्यांनी सांगितले आहे की कलेक्शन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना याचा धोका वाटतो की जो महसूल सेसच्या माध्यमातून गोळा होतो, त्यात कमी यायला नको. अशात जे उपाय सूचवण्यात आले आहेत त्यात सांगण्यात आले की तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादने आहेत ज्यावर सेस वाढवण्यात येऊ शकतो. सध्या तंबाखू उत्पादनात 27 उत्पादने आहेत ज्यावर 5 टक्क्यांपासून 290 टक्क्यांपर्यंत सेस लागतो. जेथे सेस कमी आहे तेथे सेस वाढवण्यात येईल.

कोळशावर वाढू शकतो जीएसटी –
कोळशाच्या माध्यमातून कमाई वाढवायची असेल तर जीएसटीच्या दरात वाढ करण्यात येऊ शकते. याशिवाय इनवर्टेड ड्यूटी स्ट्रक्चर उत्पादनासंबंधित फेरविचारच्या सूचना देण्यात येणार आहे. जीएसटी सेस गोळा करुन 8000 कोटी रुपयांचा तोट्याची शक्यता आहे.

जीएसटी सेसमधील तोटा 3 – 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता –
पुढील आर्थिक वर्षात जीएसटी सेसमधील तोटा 3 – 4 टक्के वाढू शकतो. जीएसटी तोट्याची भरपाई म्हणून केंद्रला 1.06 लाख रुपये द्यावे लागतात. सचिवाच्या समितीने सांगितले की केंद्रासारखा रिजर्व बँक आणि पीएसयूच्या डिवीडेंडसारख्या उत्पन्नाचा स्रोत नाही. केंद्रला भरपाई करावी लागेल. राज्यांची मागणी 5 वरुन 8 वर्षापर्यंत कंपन्सेशन मिळाले आहे. भरपाईत कमी होण्याचा परिस्थितीमुळे राज्यात योजनांची कपात करावी लागेल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी