फक्त सीमेवरच केला जावा अर्धसैनिक बलांचा वापर, सरकार बनवतंय योजना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकार योजना बनवत आहे की, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)शी जोडलेल्या पॅरामिलिट्री फोर्सचा वापर अंतर्गत सुरक्षेत कमीत कमी केला जावा. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आगामी काळात पॅरामिलिट्री फोर्सचा वापर केवळ देशाच्या बॉर्डरवरच केला जाईल.

सूत्रांचे म्हणणे आहे की, नुकतीच या संपूर्ण प्लॅनवर अंमलबजावणी करत बीएसएफच्या 20 कंपन्या, एसएसबीच्या 30 कंपन्या आणि आयटीबीपीच्या सुमारे 35 कंपन्यांना अंतर्गत संरक्षणातून हटवून त्यांना बॉर्डरवर तैनात करण्यात आले आहे. त्यांची तैनाती आता सीमेवर सुरक्षेसाठीच करण्याची योजना आहे.

सूत्रांनुसार, बॉर्डर गर्डिंग फोर्सचा वापर जास्तीतजास्त सीमेवर व्हावा, अंतर्गत सुरक्षेत होऊ नये. अंतर्गत सुरक्षेसाठी सीआरपीएफचा वापर केला जावा. सीआरपीएफ, ज्यामध्ये जवानांची संख्या 3 लाख 25 हजार आहे, त्यांना अंतर्गत सुरक्षेत वापरले जावे. सीआरपीएफचा वापर निवडणुकीच्या ड्यूटीत केला जावा. निवडणुकीत बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीचा वापर होऊ नये.

सूत्रांनुसार, प्रत्येक वर्षी निवडणुकीत आणि अंतर्गत सुरक्षेत बॉर्डर गर्डिंग फोर्सला तैनात केले जाते. मात्र, आगामी काळात भारत-पाकिस्तान सीमा, भारत-चीन सीमा, भारत- बांग्लादेश सीमा, भारत-नेपाळ बॉर्डर आणि भारत-भूतान बॉर्डरवर देशाची रक्षण करणारा पॅरामिलिट्री फोर्स बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी, ज्यांची अंतर्गत सुरक्षा आणि निवडणुकीत लावले जाते, त्यांना हळुहळु केवळ बॉर्डर गर्डिंगपर्यंतच मर्यादित ठेवले जावे.