सरकारची मोठी घोषणा ! ‘कोरोना मॉड्युल अॅप’ बनवा अन् जिंका तब्बल 1 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जगभरातून कोरोना लशीबाबत चांगल्या बातम्या येताना दिसत आहे. अशातच आता केंद्र सराकारनं मोठी घोषणा केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर लशीचं वितरण आणि त्याची नेटवर्क यंत्रणा मजबूत करण्यासाठी CoWIn लाँच करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर याचा वापर केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनीही याबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर कोविड लशीच्या वितरणसाठीचे तंत्र प्रभावीरित्या तयार केले जाणार आहे. भारतातील इनोव्हेटर्सनं कोरोना विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मी भारतभरात कोरोना लशीच्या अभियानाबाहेर महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी CoWIn मंच मजबूत करण्यासाठी इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्सला आमंत्रित करतो. यासाठी 23 डिसेंबर पासून https://meitystartuphub.in/ नोंदणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सहभागी होण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत अर्ज करू शकता.

पहिल्या 5 अर्जदारांना यासाठी कोविन एपीआय (अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) प्रदान केला जाईल. निवडलेल्या प्रत्येक अर्जदाराला 2 लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. लॉजिस्टीकशी संबंधित आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते याचा वापर करू शकतील. या स्पर्धेतील आघाडीच्या 2 स्पर्धकांना 40 लाख आणि 20 लाख रुपये दिले जातील.

CoWIn अॅपमध्ये एकूण 5 मोड्युल आहेत. पहिलं प्रशासनिक मॉड्युल, दुसरं रजिस्ट्रेशन मॉड्युल, तिसरं व्हॅक्सिनेशन मॉड्युल, चौथं लाभान्वित स्विकृती मॉड्युल आणि पाचवं आहे रिपोर्ट मॉड्युल. यातील पहिल्या असणाऱ्या प्रशासनिक मॉड्युलमध्ये लशीसाठी वेळ निश्चित करणं आणि लशीकरण केल्या जाणाऱ्या लोकांना आणि व्यवस्थापनाला नोटीफिकेशन पाठवलं जाईल. रजिस्ट्रेशन मॉड्युलमध्ये तु्म्ही स्वत: लशीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.